1 महिना चपाती न खाल्ल्यास आपल्या शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या..
गव्हाची चपाती हा बहुतेक लोकांच्या रोजच्या आहाराचा भाग असतो. गव्हाची भाकरी खाणे टाळणारे फार कमी लोक असतात. मात्र असे बरेच लोक आहेत जे मानतात की गव्हात ग्लूटेन असते, त्यामुळे गव्हाची चपाती खाऊ नये. त्याच वेळी काही लोक मानतात की गव्हाची चपाती आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, जर कोणी महिनाभर गव्हाची चपाती खाल्ली नाही तर काय होणार?
गव्हाच्या पिठात ग्लूटेन असते, त्यामुळे गव्हाची चपाती खाऊ नये, असे सांगण्यात येते. तर, काही तज्ज्ञ चपाती खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे चपाती खावी की टाळावी असा प्रश्न पडतो. परंतु एक महिना चपाती न खाल्ल्याने शरीरात काय बदल घडतात? आहारतज्ज्ञांच्या मते, गहू आरोग्यासाठी अजिबात हानिकारक नाही. यामध्ये असलेले ग्लूटेन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे. ज्यामुळे आरोग्याला फायदाच होतो. परंतु, ज्यांना गंभीर आजार आहे, किंवा ज्यांना डॉक्टरांनी ग्लूटेनयुक्त पदार्थ खाण्यास मनाई केली आहे, त्यांनी चपाती खाणं टाळावे, किंवा कमी प्रमाणात खावी.

प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट आहे, मग ती कोणतीही गोष्ट असो. जर आपण जेवताना चपाती जास्त व इतर पदार्थ कामी खात असाल तर, ते योग्य नाही. त्यामुळे अतिरेक टाळा - प्रमाणात खा. संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. यासाठी २ चपात्यांसह, थोडा भात, डाळ आणि भाजी खा. गहू अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतो. यामध्ये पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12, फायबर, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि सोडियम यासह इतर अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
जर आपण एक महिना चपाती खात नसाल तर, शरीरातील उर्जा पातळी कमी होऊ शकते. यासोबतच अशक्तपणा, त्वचेवर पुरळ उठणे, ओठ फुटणे, मूड बदलणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, हाडे कमकुवत होणे यासारख्या समस्याही होऊ शकतात. महिनाभर गव्हाच्या पिठाची चपाती न खाल्ल्याने शरीराला विशेष फायदा होत नाही, उलट नुकसान होते.
बहुतेक लोक गव्हाचे पीठ खूप बारीक करून ते गाळून त्यातून कोंडा काढून टाकतात. मात्र ही पद्धत अजिबात चांगली नाही. गहू नेहमी थोडा बारीक बारीक करून घ्या आणि कोंडाबरोबर पीठ वापरण्याची सवय लावा. कारण रिफाइंड पीठ खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते. म्हणूनच नाचणी किंवा बाजरीचे पीठ सारखे भरड गव्हाचे पीठ वापरणे चांगले. महिनाभर गव्हाचे पीठ न खाल्ल्याने शरीराला विशेष फायदा होत नाही, उलट अपाय होतो.