Fruits: 'ही' फळे खाण्याची योग्य वेळ कोणती आणि कधी खावी? जाणून घ्या...

Fruits: 'ही' फळे खाण्याची योग्य वेळ कोणती आणि कधी खावी? जाणून घ्या...

फळे किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी खावीत, याची अचूक माहिती असणेही महत्त्वाचे आहे. अनेकजण संध्याकाळी फळे न खाण्याचा सल्ला देतात, तर कोणी जेवणानंतर फळे खाऊ नयेत, असे म्हणतात.
Published by :
Dhanshree Shintre

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी फळांचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही फळे खायला आवडतात. फळांमध्ये विविध प्रकारचे पोषक आणि अँटिऑक्सिडंट घटक असतात जे अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. आजारी असताना फक्त फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, ऐरव्हीदेखील फळे किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी खावीत, याची अचूक माहिती असणेही महत्त्वाचे आहे.

1. केळी

सकाळी किंवा दुपारी जेवणानंतर 2-3 तासांनी केळी खाल्ली तर चालेल. केळ्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्वचा उजळून तेज येते. मात्र, रात्री झोपण्यापूर्वी किंवा रिकाम्या पोटी केळे खाऊ नये. अन्यथा सर्दी, पडसे होऊ शकते.

2. सफरचंद

सफरचंद आरोग्याच्या आतड्यांसाठी फायदेशीर असते. सफरचंदाच्या सेवनामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी किंवा दुपारी जेवणानंतर सफरचंद खावे. सफरचंद लवकर पतर नाही, त्यामुळे संध्याकाळी, रात्री सफरचंद खाल्ल्यास पोटात गॅस होतो. कधी कधी पोटदुखीचाही त्रास जाणवतो.

3. संत्री

संत्र्यामुळे पचनशक्ती वाढते, चयापचय प्रक्रिया सुधारते. रिकाम्या पोटी नाश्त्यासाठी संत्री खाल्ल्यास पोटात गॅस किंवा जळजळ होऊ शकते. काही जणांना रिकाम्या पोटी संत्री खाल्ल्याने अ‍ॅलर्जीचा त्रास होतो.

4. पपई

नाश्ता किंवा दुपारचे जेवण झाल्यावर पपई खाणे फायदेशीर ठरते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. पपई खाल्ल्याने मुरुमे, सुरकुत्या यांची समस्या दूर होते. मात्र, रात्री पपई खाणे टाळावे. त्यामुळे पचनक्रिया बिघडू शकते. आंबट पदार्थ किंवा फळांसोबत पपई खाऊ नये.

5. मोसंबी

उन्हाळ्यात सकाळी किंवा दुपारी उन्हात जाण्यापूर्वी किंवा उन्हातून घरी आल्यावर मोसंबी खावी. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. पण, रिकाम्या पोटी मोसंबी खाणे टाळावे. त्यामुळे गॅस किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. रात्रीच्या जेवणानंतरही मोसंबी खाणं टाळा.

Fruits: 'ही' फळे खाण्याची योग्य वेळ कोणती आणि कधी खावी? जाणून घ्या...
Curd: पावसाळ्यात दही खावे की नाही? जाणून घ्या...

6. द्राक्षे

सकाळी रिकाम्या पोटी द्राक्ष खाल्ल्यास शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर द्राक्षे खाणे टाळा.

7. डाळिंब

डाळिंब नेहमी सकाळी खावे. त्यामुळे दिवसभराला शरीराला ऊर्जा मिळते. रात्री झोपण्यापूर्वी डाळिंब खाल्ल्याने त्याचा शरीराला कोणताही फायदा होत नाही.

8. पेरु

सकाळी उपाशीपोटी पिकलेला पेरु खाणे खूप फायद्याचे ठरते. पेरु आतड्यांची हालचाल वाढवून घट्ट मल पुढे सरकवतो, त्यामुळे पोट साफ होते. दुपारी जेवणानंतरही पेरु खाता येईल. पण, रात्री पेरु खाणे टाळा. फ्रिजमध्ये ठेवलेला पेरु तर अजिबात खाऊ नये.

9. अननस

सकाळी 10 ते 11 किंवा संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत अननस खावे. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे चयापचय सुधारते, वजन कमी होण्यास मगत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हाडे मजबूत होतात. मात्र, त्याच्या अतिसेवनाने पोटदुखी, जुलाबाचा त्रास उद्भवू शकतो.

10. खजूर

सकाळी खजूर खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. खजूरामुळे आतड्यातील जंत नष्ट होण्यास मदत होते, अवयवांची स्वच्छता होते. ह्रदयाचे किंवा यकृताचे आरोग्य सुधारते. रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. जेवणानंतर खजूर खाणे त्रासदायक ठरते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com