तुमच्या ओठांचा रंग सांगतो तुमच्या आजारांविषयी; जाणून घ्या

तुमच्या ओठांचा रंग सांगतो तुमच्या आजारांविषयी; जाणून घ्या

ओठांचा रंग बदलणे हे शरीरातील काही गडबडीचे लक्षण आहे. चला तर मग जाणून घेऊया...
Published on

Lip Color : शरीरावरील कोणत्याही खुणा हलक्यात घेऊ नका तर रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखा. लहानपणी ओठांचा रंग नेहमी गुलाबी असायचा पण कालांतराने त्यांचा रंग बदलू लागतो. ओठांचा रंग जांभळा, पांढरा आणि काळा होऊ लागतो. ओठांचा रंग बदलणे हे अनेक रोगांचे प्रारंभिक लक्षण असते. ओठांचा रंग बदलणे हे शरीरातील काही गडबडीचे लक्षण आहे. चला तर मग जाणून घेऊया...

तुमच्या ओठांच्या रंगाचा अर्थ काय?

लाल ओठ

ओठांचा रंग गुलाबी ऐवजी लाल दिसू लागला तर हे यकृताच्या आजाराचे लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीच्या लिव्हरमध्ये समस्या असल्यास ओठांचा रंग लाल दिसू लागतो. शरीरात कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी झाली तरी ओठांचा रंग लाल होऊ लागतो.

पिवळे आणि पांढरे ओठ

जर ओठांचा रंग पिवळा आणि पांढरा होऊ लागला तर स्पष्ट कारण आहे की तुम्हाला अ‍ॅनिमिया आहे. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे ओठ पांढरे होऊ लागतात. याशिवाय जेव्हा रक्तातील बिलीरुबिनची पातळी वाढू लागते. तेव्हा ओठांचा रंग पिवळा दिसू लागतो. काही वेळा व्हायरल इन्फेक्शनमुळे ओठांचा रंग पिवळा आणि पांढरा होऊ लागतो.

काळे ओठ

ब्युटी प्रोडक्ट्सच्या जास्त वापरामुळे ओठांचा रंग काळा होऊ लागतो. या सर्वांशिवाय सिगारेट ओढण्यामुळेही ओठांचा रंग काळा होऊ लागतो.

जांभळे ओठ

कधी कधी अतिथंडीमुळे ओठांचा रंग बदलून जांभळा रंग दिसू लागतो. ज्या लोकांना हृदय किंवा फुफ्फुसांशी संबंधित आजार आहेत, त्यांच्या ओठांचा रंगही जांभळा दिसतो. यासोबतच पोट आणि पचनाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांच्या ओठांचा रंगही जांभळा दिसतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com