थंडीतही शरीर राहील उबदार, रोज फक्त 'या' दोन गोष्टी खा, काजू आणि बदामही त्याच्यासमोर फिके

थंडीतही शरीर राहील उबदार, रोज फक्त 'या' दोन गोष्टी खा, काजू आणि बदामही त्याच्यासमोर फिके

हिवाळ्यात लोक आपल्या शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी खातात. बहुतेक लोक काजू-बदाम किंवा ड्रायफ्रुट्स घेऊन शरीर उबदार ठेवण्याचा प्रयत्न करतात.
Published on

हिवाळ्यात लोक आपल्या शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी खातात. बहुतेक लोक काजू-बदाम किंवा ड्रायफ्रुट्स घेऊन शरीर उबदार ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, महाग असल्याने काजू-बदाम खरेदी करणे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. अशा परिस्थितीत आयुर्वेद डॉक्टरांनी स्वस्तात मिळणाऱ्या गूळ आणि तिळाचे फायदे सांगितले आहेत. या दोन्ही गोष्टी हिवाळ्यात सुक्या मेव्याप्रमाणे शरीरात उष्णता निर्माण करतात. जाणून घेऊया तीळ आणि गुळाचे फायदे...

थंडीतही शरीर राहील उबदार, रोज फक्त 'या' दोन गोष्टी खा, काजू आणि बदामही त्याच्यासमोर फिके
एक चमचा मेयोनीझ खाणे म्हणजे तुम्ही 'इतके' तेल खाल्ले; जाणून घ्या

तीळ आणि गुळाचे सेवन कसे करावे?

तीळ शरीरासाठी खूप चांगले मानतात. देशी गाईच्या तुपानंतर तिळाचे तेल सर्वोत्तम मानले जाते आणि त्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात नियमितपणे गुळामध्ये तीळ मिसळून खाल्ल्याने शरीर उबदार राहते आणि सर्दी, खोकला आणि फ्लूचा धोका कमी होतो. तीळ आणि गुळाचे लाडू किंवा 20-25 ग्रॅम तीळ रोज खाल्ल्याने फायदा होतो.

तीळ का फायदेशीर आहेत?

तिळात आढळणारे गुणधर्म काजू-बदामातही आढळत नाहीत. प्रथिने, कॅल्शियम, फायबर, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-बी1, तांबे आणि जस्त यांच्यासोबतच सेसामिन आणि सेसमोलिन नावाची दोन संयुगे यामध्ये आढळतात, जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्याचे काम करतात. याशिवाय तीळ हृदयविकारापासून बचाव करण्यासही मदत करतात. याचे कारण म्हणजे यामध्ये आढळणारे फायटोस्टेरॉल आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, जे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू देत नाहीत.

तीळ आणि गूळ कोणी खाऊ नये?

तीळ आणि गूळ हे आरोग्यासाठी खूप चांगले असतात. दोन्हीचे मिश्रण खाल्ल्याने हिवाळ्यात शरीराला खूप फायदा होतो. पण मधुमेही रुग्णांनी गूळ खाऊ नये. कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो आणि त्यामुळे साखर वाढू शकते. तर तिळामध्ये काही सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स आढळतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते. त्यामुळे तीळ भाजून त्यात तूप किंवा इतर ड्रायफ्रुट्स मिसळून खाऊ नयेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com