वजन कमी करण्यासाठी तुम्हीही लिंबू आणि गरम पाणी पिता; खरंच फायदा होतो का?

वजन कमी करण्यासाठी तुम्हीही लिंबू आणि गरम पाणी पिता; खरंच फायदा होतो का?

अनेकदा लोक कोमट पाण्यात लिंबू टाकून सकाळी रिकाम्या पोटी प्या, असा सल्ला अनेकांकडून दिला जातो. पण, कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने खरंच काही फायदा होतो का, असा प्रश्न पडतो तर मग जाणून घेऊया...
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Lemon Water : आजकाल खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्यामुळे वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात. काही जिम, चालणे, धावणे तर काही डायटिंगच्या माध्यमातून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी, काही लोक घरगुती उपायांद्वारे त्यांचे वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक अतिशय सामान्य घरगुती उपाय म्हणजे लिंबू पाणी पिणे, असे अनेकदा सांगितले जाते. अनेकदा लोक कोमट पाण्यात लिंबू टाकून सकाळी रिकाम्या पोटी प्या, असा सल्ला अनेकांकडून दिला जातो. पण, कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने खरंच काही फायदा होतो का, असा प्रश्न पडतो तर मग जाणून घेऊया...

लिंबू घालून गरम पाणी पिणे खरंच योग्य आहे का?

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे प्यायल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप मजबूत होते. यासोबतच आपली पचनक्रियाही सुधारते. पण, कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने शरीरातील चरबी वितळते का, हा प्रश्न आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की हे एक फक्त मिथक आहे. तुम्ही रोज गरम पाण्यात लिंबू प्यायल्यास तुमच्या शरीरातील चरबी कमी होते, असे काही नाही. हे केवळ एक मिथक आहे.

लिंबू पाण्यात मध मिसळून पिणे देखील योग्य आहे का?

लिंबू पाण्यात मध मिसळून पिणे हा कॉम्बो तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो, असे आयुर्वेदिक तज्ञांचे मत आहे. आयुर्वेदानुसार गरम पाणी आणि मध यांचे स्वरूप एकमेकांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. हे प्यायल्याने पचनाच्या समस्याही होऊ शकतात. पुरळ देखील उमटू शकतात. लिंबूची चव आंबट आणि प्रभावाने गरम असते. दुसरीकडे, मध चवीला गोड, जड आणि कोरडा आणि प्रभावाने थंड असतो. मध आणि लिंबू यांचे मिश्रण बरे होण्यास प्रोत्साहन देते. परंतु, आयुर्वेद कोणत्याही गरम पदार्थासह (गरम पाण्यासह) दोन्ही वापरण्याची शिफारस करत नाही. कारण यामुळे त्यांचे नैसर्गिक गुणधर्म बदलतात, जे आपल्या पचन आणि रोगप्रतिकारक प्रणालीसाठी चांगले नसतात.

लिंबू पाणी प्यायल्याने त्वचेला फायदा

लिंबू कोमट पाण्यात टाकून प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते. तसेच, त्वचा चमकू लागते. यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे सुरकुत्या कमी होतात. आणि कोरडी त्वचा होत नाही.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com