Eye Swelling : सकाळी उठताच सुजतात डोळे ? करा मग हे उपाय
सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांना अशी सूज आली असल्यास आपला विचित्र दिसतोच. त्याचप्रमाणे ही सूज जर दोन ते तीन तास राहिली तर कधीकधी चेहरा देखील खराब दिसतो. डोळ्यांना व पापण्यांना आलेली सूज तशीच राहिल्यास आपल्याला तसाच चेहेरा घेऊन ऑफिसमध्ये किंवा इतर कामाच्या ठिकाणी जाणे कठीण होते. अशा परिस्थिती काही सोपे उपाय करून आपण ही डोळ्यांची व पापण्यांची सूज लगेच घालवू शकतो.
जाणून घ्या काही उपाय
टी बॅगचा वापर करा - बऱ्याच लोकांना ग्रीन टी किंवा टी बॅग वापरुन चहा पिण्याची सवय असते, असे लोकं चहा प्यायल्यानंतर चहाची टी बॅग फेकून देतात. डोळ्यांची सूज दूर करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी चहाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवा आणि रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर सुमारे १५ मिनिटे डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
बर्फाचा खडा - बर्फाचा खडा वापरल्याने डोळ्यांवरील सूज दूर होते. सुती कपड्यात बर्फाचा खडा गुंडाळा आणि डोळ्यांना मसाज करा. यामुळे सूज कमी होण्यास मदत होईल.
चमच्याचा वापर करा - २ किंवा ३ चमचे घ्या आणि १० ते १५ मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर चमच्याच्या विरुद्ध बाजूने चमचा डोळ्यांवर लावा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळून सूज कमी होईल.
एलोव्हेरा जेल - सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम थंड पाण्याचा हबका संपूर्ण चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर मारून डोळे स्वच्छ करून घ्यावेत. त्यानंतर डोळ्यांच्या आजूबाजूला ज्या भागांवर सूज आली आहे, त्या भागांवर बोटांच्या मदतीने एलोव्हेरा जेल लावून मसाज करावा.
बटाट्याचे काप - सुरूवातीला बटाटे किसून घ्या आणि त्याचा रस काढा. त्यानंतर कापसाने तो रस आपल्या डोळ्यांना लावा. रस १५ ते २० मिनिटे ठेवावा. यामुळे हळूहळू डोळ्यांची सूज कमी होईल.
गुलाब पाणी - गुलाब पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी आपण गुलाबपाणी वापरू शकता. यासाठी, गुलाबाचे पाणी अर्ध्या तासासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे लागेल. यानंतर, कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली हे पाणी लावा.