आजकाल वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. अत्यंत महागातले पदार्थ खाऊनच वजन कमी करता येते असा अनेकांचा समजदेखील असतो. मात्र महाराष्ट्रातल्या घराघरात बनणाऱ्या झुणका-भाकरीनेदेखील वजन कमी करता येते. याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का ? जाणून घेऊया झुणका - भाकर खाण्याचे फायदे.
झुणका भाकर सेवनाने आपल्याला उत्तम दर्जाची संपूर्ण प्रोटिन्स तर मिळतातच. शिवाय भरपूर कॅलरीजही उपलब्ध होतात. धान्य व डाळीच्या योग्य अशा मिश्रणाने उदा. ३-१ या प्रमाणात तर आपल्याला उत्तम जैविक मूल्य असलेली प्रोटिन्स मिळतात.
ज्वारीची भाकरी, हे धान्य व बेसनचा झुणका ही डाळ ! यापासून मिळणाऱ्या प्रोटिन्सचा दर्जा मांसाहारी प्रोटिन्स इतकाच उत्तम आहे.
भाकरीमध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळता येते.
कांदा आणि लसणामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
झुणका-भाकर हे एक पौष्टिक, स्वादिष्ट आणि परवडणारे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, ज्यामुळे ते आपल्या आहारात नक्कीच समाविष्ट करायला हवे.