Daily Horoscope 15 December Rashi Bhavishya : कुंभ राशीला जोडीदाराकडून सरप्राईझ मिळणार; पाहा तुमचे भविष्य

Daily Horoscope 15 December Rashi Bhavishya : कुंभ राशीला जोडीदाराकडून सरप्राईझ मिळणार; पाहा तुमचे भविष्य

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.
Published on

मेष (Aries Horoscope Today) : आर्थिक चणचण जाणवेल. तुमच्या कुटुंबातील सदस्य राईचा पर्वत करण्याची शक्यता आहे. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील.

वृषभ (Taurus Horoscope Today) : अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र/मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. तुम्हाला आनंदी करण्यासाठी जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.

मिथुन (Gemini Horoscope Today) : हुशारीने गुंतवणूक करा. तुमच्या जवळचे कुणीतरी अंदाज करता येणार नाही अशा मूडमध्ये असेल. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅण्टीक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. अलिकडेच मिळालेल्या यशामुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे कौतुक होईल आणि सहकाऱ्यांकडून त्यांना पाठिंबाही मिळेल.

कर्क (Cancer Horoscope Today) : पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक. नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. तुमचे तुमच्या जोडीदाराशी दिवसभरात भांडण होईल.

सिंह (Leo Horoscope Today) : शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल.

कन्या (Virgo Horoscope Today) : धनलाभ होण्याची शक्यता. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सध्याची नोकरी सोडून तुम्हाला सूट होणाऱ्या मार्केटींग यांसारख्या क्षेत्रात काम करावे. जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.

तूळ (Libra Horoscope Today) : धन लाभाची शक्यता. रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही पैसा कमावण्यात सक्षम होणार नाही. मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकतात. जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : आर्थिक पक्ष मजबूत राहील. जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील.

धनु (Sagittarius Horoscope Today) : आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच. जोडीदार तुम्हाला आज आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे.

मकर (Capricorn Horoscope Today) : व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. आध्यत्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकतात. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces Horoscope Today) : आर्थिक लाभ होण्याची शक्यत. लाभदायक दिवस. कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राइझ देणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com