Daily Horoscope 18 November Rashi Bhavishya : 'या' राशींना दिवस फारसा लाभदायक नाही; पाहा तुमचे भविष्य

Daily Horoscope 18 November Rashi Bhavishya : 'या' राशींना दिवस फारसा लाभदायक नाही; पाहा तुमचे भविष्य

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मेष (Aries Horoscope Today) : अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. तुम्हाला मदतीचा हात देण्यास तुमचे नातेवाईक तयारी दर्शवतील. जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल. एकांतात वेळ घालवाल.

वृषभ (Taurus Horoscope Today) : आर्थिक बचत करा. मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज. जोडीदारासोबत संध्याकाळ चांगली घालवाल. रिकामा वेळेत नकारात्मक विचार तुम्हाला जास्त चिंतीत करू शकतात. दुसरीकडे मन गुंतवण्याचा प्रयत्न करा.

मिथुन (Gemini Horoscope Today) : धन लाभ होईल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील. कामाच्या ठिकाणी सावध राहा.

कर्क (Cancer Horoscope Today) : आर्थिक स्थिती सामान्य राहील. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळित असणार नाही. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यत्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकतात. नातेवाइकांना भेटून तुम्ही सामाजिक दायित्वाची पूर्ती करू शकतात.

सिंह (Leo Horoscope Today) : धन कमावण्यात यशस्वी व्हाल. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे.

कन्या (Virgo Horoscope Today) : आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियांसमवेत पार्टीसाठी जा. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे.

तूळ (Libra Horoscope Today) : आर्थिक लाभ होतील. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. छान भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल. व्यर्थ वेळ घालवण्याऐवजी आज कुठली विदेशी भाषा शिकणे तुमच्या वार्तालापच्या गोष्टींमध्ये वृद्धी करू शकते.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : आर्थिक तणाव येईल. मनावर नियंत्रण ठेवा. जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे. आज तुम्ही रागात कुटुंबातील कुणी सदस्याला चांगले-वाईट बोलू शकतात.

धनु (Sagittarius Horoscope Today) : आर्थिक स्थिती बिघडेल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. सायंकाळसाठी काही तरी खास योजना आखा. जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. कोणतेही कामं उद्यावर टाकू नका हेच तुमच्यासाठी चांगले असेल.

मकर (Capricorn Horoscope Today) : धन लाभ होण्याची शक्यता. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही. कामांच्या ठिकाणी कामाचे प्रेशर येईल. जोडीदार तुमच्यासाठी काहीतरी खास करेल.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषत: रागावर नियंत्रण मिळवा. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. कामाच्या ठिकाणी संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. यात्रेमध्ये कुणी अनोळखी व्यक्ती सोबत भेट तुम्हाला चांगले अनुभव देऊ शकते.

मीन (Pisces Horoscope Today) : आर्थिक नुकसान होऊ शकते. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता. प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com