Daily Horoscope 19 August Rashi Bhavishya: 'या' राशींनी जीभेवर ताबा ठेवावे अन्यथा...; पाहा तुमचे भविष्य
मेष (Aries Horoscope Today) : आर्थिक परिस्थिती सावरेल. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईझ देऊ शकतात. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकतात.
वृषभ (Taurus Horoscope Today) : नको ते विचार मनात घोळतील. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. अतिशय क्षुल्लक कारणांवरू जोडीदारासोबत तणाव होईल.
मिथुन (Gemini Horoscope Today) : शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणे चांगले. दुधाच्या व्यवसायात आर्थिक लाभ. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आपल्या वेळेची किंमत समजा. वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. मीडिया फिल्डने जोडलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणारा आहे.
कर्क (Cancer Horoscope Today) : मादक पदार्थांचे सेवन करू नका. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अतिभावूक बोलू नका. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. तुम्हाला आपल्या व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता आहे.
सिंह (Leo Horoscope Today) : आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य. जोडीदार आणि मुलांसोबत वेळ घालवा. कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रवासात आज कुणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला नाराज करू शकतो.
कन्या (Virgo Horoscope Today) : भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसेल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. तुम्ही एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. या राशीतील व्यावसायिकांसाठी आज उत्तम स्वप्न खरे होण्यासारखे असेल.
तूळ (Libra Horoscope Today) : धन प्राप्ती होऊ शकते. घराकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतील. कुटुंबासोबत बोलताना जपून अन्यथा संबंध ताणतील. तुमच्या घरातील लोकांना आज तुमच्या साथची आवश्यकता असू शकते. त्यांच्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल. जमीन खरेदी-विक्री प्रकरणी चांगला व्यापारी मिळू शकतो. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आपल्या कामाकडे आज तुमचे चांगले लक्ष असेल. तुमच्या कामाला पाहून आज बॉस तुमच्याशी खुश होऊ शकतात.
धनु (Sagittarius Horoscope Today) : योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असेल, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल.
मकर (Capricorn Horoscope Today) : दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले. तुमच्या जवळ आज पैसा पर्याप्त असेल. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. कुटुंबातील लोकांसोबत घालवाल. तुमचा/तुमची जोडीदार आज खूप छान मूडमध्ये आहे.
कुंभ (Aquarius Horoscope Today) : आर्थिक फायदा मिळेल. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. बऱ्याच कामांना सोडून तुम्ही आज आपल्या आवडीच्या कामांना करण्याचे मन बनवाल. आपल्या वडिलांसोबत आज मित्रांप्रमाणे बोलू शकतात. तुमच्या गोष्टींना ऐकून त्यांना आनंद होईल.
मीन (Pisces Horoscope Today) : आर्थिक स्थितीतील बदल होतील. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फूल्ल होईल. कामाचा डोंगर असेल. तुमचा जोडीदारासोबत फिरायला जाण्याच प्लॅन बनवाल. सुंदर संध्याकाळ व्यतीत कराल.