Daily Horoscope 2 september Rashi Bhavishya: कसा असेल तुमचा दिवस? वाचा
मेष (Aries Horoscope Today) : स्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. कुणी मित्रांची मदत करून आज तुम्हाला चांगले वाटू शकते.
वृषभ (Taurus Horoscope Today) : आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. तुमच्या जवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती असेल. आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.
मिथुन (Gemini Horoscope Today) : आर्थिक स्थिती सुधारेल. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेऊ नका. प्रवासाच्या संधी शोधाल.
कर्क (Cancer Horoscope Today) : आर्थिक दृष्टीने दिवस चांगला. सामाजिक, धर्मादाय कामावर लक्ष केंद्रीत कराल. आपल्या अडचणी प्रश्न घेऊन येणाऱ्यांना तुम्ही मदत कराल. कामाचा डोंगर असला तरी स्वतःसाठी वेळ काढाल. जोडीदारासोबत रोमॅण्टीक संध्याकाळ घालवाल.
सिंह (Leo Horoscope Today) : आर्थिकदृष्या सामान्य दिवस. कठीण मेहनत करावी लागेल. जुने मित्र आधार देतील आणि मदत करतील. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. जीवनाला आज तुम्ही जवळीकतेने जाणून घ्याल.
कन्या (Virgo Horoscope Today) : आर्थिक समस्या उद्भवेल. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियांसमवेत पार्टीसाठी जा. एकच काम रोज करणे प्रत्येक माणसाला थकवते, आज तुम्हाला ही हा त्रास जाणवू शकतो.
तूळ (Libra Horoscope Today) : अतिचिंतेने आणि तणावामुळे हायपरटेन्शन वाढेल. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता. नातेवाईकांसोबत मतभेद निर्माण होतील. गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : आर्थिक बचत करणे गरजेचे. मोकळ्या वेळेचा उपयोग करून कुटूंबातील सदस्यांना मदत करा. जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. मित्रांसोबत थट्टा करतांना आपल्या सीमा ओलांडू नका अथवा मित्राता खराब होऊ शकते. कामांच्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज.
धनु (Sagittarius Horoscope Today) : पैसा धार्मिक कार्यात लावू शकता. मित्र आणि जवळचे स्नेही मदतीचा हात पुढे करतील. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील. सामाजिक कार्यात मिसळल्याने तुमच्या ज्ञानात भर पडू शकते.
मकर (Capricorn Horoscope Today) : गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. खास खरेदी करेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today) : अशा लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत राहू शकतात. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते.
मीन (Pisces Horoscope Today) : आर्थिक स्थिती सांभाळा. आज घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.मित्र आणि जवळच्या लोकांसोबत बाहेर जाऊन सिनेमा पाहण्याची योजना ही बनवू शकतात.