Daily Horoscope 23 August Rashi Bhavishya: कसा असेल तुमचा आजचा दिवस? वाचा

Daily Horoscope 23 August Rashi Bhavishya: कसा असेल तुमचा आजचा दिवस? वाचा

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.
Published on

मेष (Aries Horoscope Today) : गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता. ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहे आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकतात.

वृषभ (Taurus Horoscope Today) : आर्थिक लाभ होईल. आजच्या दिवशी मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रीत करा. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope Today) : आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो/ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल.

कर्क (Cancer Horoscope Today) : आर्थिक गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास साहाय्य आणि प्रेम देतील. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी कष्टाचे चीज होणार आहे.

सिंह (Leo Horoscope Today) : गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. आपल्या जवळच्या लोकांसोबत तुम्हाला वेळ घालवण्याची इच्छा होईल. पण, कामाच्या ताणामुळे वेळ देणे शक्य होणार नाही.

कन्या (Virgo Horoscope Today) : खर्च करताना उधळपट्टी करू नका. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल.

तूळ (Libra Horoscope Today) : तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. संभाषणातील अनेक सूचना आपल्या कुटुंबियांना लाभदायक ठरतील. व्यावसायिकांना बढती आणि आर्थिक फायदा मिळेल. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : धन लाभ होण्याची शक्यता. जीवनसाथीचे आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्याची गरज. गैरसमजामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.

धनु (Sagittarius Horoscope Today) : जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. कामाच्या ठिकाणी घाई करु नका अन्यथा दुष्परिणाम होतील. तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल आणि त्यामुळे विवाहबंधन तोडण्यासाठी तुम्ही उद्युक्त होण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn Horoscope Today) : जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. प्रलंबित देणी सांपत्तिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी आज तुमचा दिवस आहे. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. जोडीदारासोबत उत्तम संध्याकाळ घालवाल.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : लघू उद्योगांना आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस.

मीन (Pisces Horoscope Today) : पैशांची योग्य गुंतवणूक करा. भरपूर आनंदाचा दिवस. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com