Daily Horoscope 29 August Rashi Bhavishya: 'या' तीन राशींना आजचा दिवस लाभदायी; पाहा तुमचे भविष्य
मेष (Aries Horoscope Today) : धन लाभ होऊ शकतो. दूरवरच्या नातेवाईकाकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील.
वृषभ (Taurus Horoscope Today) : नवीन प्रकल्पात दुहेरी फायदा होईल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. कामाच्या ठिकाणा आज तुमचा दिवस आहे.
मिथुन (Gemini Horoscope Today) : आपला संयम ढळू देऊ नका. अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. कुटुंबाच्या आघाडीवर काही त्रासदायक प्रश्न निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल.
कर्क (Cancer Horoscope Today) : मानसिक ताणतणावर मात करण्यासाठी अध्यात्मिक, धार्मिक उपाययोजनांची तातडीची गरज. मर्यादेबाहेर खर्च करू नका. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल.
सिंह (Leo Horoscope Today) : आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. आजचा पूर्ण वेळ ही ऑफिसचे काम पूर्ण करण्यात जाईल. जोडीदाराकडून कदाचित काही सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे.
कन्या (Virgo Horoscope Today) : नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळेल. राहते घर बदलणे अत्यंत शुभदायी ठरेल. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल
तूळ (Libra Horoscope Today) : धन लाभ होण्याची शक्यता. मानसिक शांती मिळेल. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. दिवसाची सुरवात जरी थोडी थकणारी राहील परंतु, जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. जोडीदारासोबत रोमॅण्टीक संध्याकाळ व्यतीत कराल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : तुमचे कुटुंब तुमच्याकडून खूप अधिक अपेक्षा ठेवेल. खर्च अधिक होऊ शकतो. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल.
धनु (Sagittarius Horoscope Today) : आजचा दिवस फारसा लाभदायक नाही. खर्चांवर मर्यादा घाला. घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील.
मकर (Capricorn Horoscope Today) : आर्थिक स्थिती सामन्य असेल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. कामांच्या ठिकाणी उत्तम कार्य कराल. जोडीदारांची साथ मिळेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today) : लाभदायक दिवस. आर्थिक हानी संभवते. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. कामाच्या ठिकाणी कौतुक होण्याची शक्यता. प्रवासाचे बेत ठरतील. जोडीदारांवरील प्रेम व्यक्त कराल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे.
मीन (Pisces Horoscope Today) : पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरु करण्यास शुभ दिवस. चांगले यश मिळण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्या. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल.