Daily Horoscope 9 september Rashi Bhavishya: मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींचा शनिवार कसा राहील? पाहा
मेष (Aries Horoscope Today) : आर्थिकदृष्ट्या समाधानकारक स्थिती. तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्हाला सुखकारक वाटेल. आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकतात.
वृषभ (Taurus Horoscope Today) : आर्थिक बचत करा. भावनिक आत्मविशास वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालिनतेने वागा. प्रवासाने भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल.
मिथुन (Gemini Horoscope Today) : गुंतवणुकीतून आर्थिक तोटा होण्याची शक्यता. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे.
कर्क (Cancer Horoscope Today) : घरातील आर्थिक स्थितीचा तुमच्या डोक्यावर भार असेल. जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. कामांच्या ठिकाणी कौतुक होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज.
सिंह (Leo Horoscope Today) : आर्थिक समस्या निर्माण होतील. ऑफिसच्या कामाच्या कारणास्तव अचानक तुमचे सर्व प्लॅन कॅन्सल होतील. प्रवासाचा दिवस. यामुळे थकून जाल. वेळ न दिल्याने कुटुंबिय नाराज असतील. पण, तुमचा जोडीदार सांभाळून घेईल.
कन्या (Virgo Horoscope Today) : गुंतवणुकीतून फायदा. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा.
तूळ (Libra Horoscope Today) : खर्च भागतील. भरपूर आनंदाचा दिवस. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल. आजची कामे उद्यावर टाकू नका. आळस महागात पडेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : आर्थिक स्थिती चांगली. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करा. जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. आज आपल्या कुटुंबासोबत तुम्ही फिरायला जाण्याचा आनंद घेऊ शकतात. कामावर अभूतपूर्ण दिवस.
धनु (Sagittarius Horoscope Today) : व्यर्थ खर्च टाळा. कुटुंबियांसोबत वेळ घालावा. जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राइझ देणार आहे. तुमच्या गोष्टी आज तुमच्या जवळच्यांना समजणार नाही त्यामुळे तुम्हाला चिंता वाटेल. दारू किंवा सिगारेटचे खूप जास्त सेवन करणे आज तुमच्या आरोग्याच्या स्थितीला खराब करू शकते.
मकर (Capricorn Horoscope Today) : आर्थिक चढउतारांमुळे फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. प्रेम आशेचा किरण दाखवेल. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुम्ही वचन द्यााल. आज वैवाहिक आयुष्यात एक छान डिनर आणि मस्त झोप मिळणार आहे.
कुंभ (Aquarius Horoscope Today) : मर्यादेबाहेर खर्च करू नका. कंटाळवाण्या आणि धीम्या अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल. कामाच्या ठिकाणी पाठ थोपटून घेण्याची संधी मिळेल.
मीन (Pisces Horoscope Today) : धन लाभ होण्याची शक्यता. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.