Daily Horoscope 11 August Rashi Bhavishya: कसा असेल तुमचा आजचा दिवस? वाचा

Daily Horoscope 11 August Rashi Bhavishya: कसा असेल तुमचा आजचा दिवस? वाचा

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मेष (Aries Horoscope Today) : तब्येत एकदम उत्तम असेल. धनलाभ होईल. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. तुमची प्रिय व्यक्तीसाठी खास बेत आखाल. तुम्ही ध्यान योग करण्यात वेळ घालवू शकतात. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

वृषभ (Taurus Horoscope Today) : आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आर्थिक आघाडीवर सुधारणा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. या राशीतील मुलांना दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राइझ देणार आहे.

मिथुन (Gemini Horoscope Today) : आर्थिक हानी होण्याची शक्यता. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पुऱ्या करण्याची काळजी घेईल. आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल.

कर्क (Cancer Horoscope Today) : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज. आर्थिक फायदा संभवतो. मुलांवर आपली मते लादण्यामुळे ती त्रस्त होतील. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला तळहातावरच्या फोडासारखं जपेल.

सिंह (Leo Horoscope Today) : आजच्या दिवशी धन हानी होण्याची शक्यता. ऑफिस मध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. किमती वेळेचा योग्य वापर करा. जोडीदारांसोबतचे क्षण आठवून भावूक व्हाल.

कन्या (Virgo Horoscope Today) : आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली नाही. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. वैवाहिक आयुष्याचा विचार करता आज तुमचे जीवन खूप सुंदर झाले आहे.

तूळ (Libra Horoscope Today) : आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता. अनेक दिशांमध्ये अनेक बाजूंनी तुमची ओढाताण होईल. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकतात. आज तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक संध्याकाळ घालवाल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात. पत्नीशी सुसंवाद साधून स्वरमिलाफ साधणारा दिवस. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळतील.

धनु (Sagittarius Horoscope Today) : आर्थिक तंगीमध्ये येऊ शकतात. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनादेखील तयार कराल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दु:खद आठवणी विसरून जाल.

मकर (Capricorn Horoscope Today) : शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा. व्यर्थ खर्च करणे टाळा. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. या राशीतील व्यावसायिकांना आजच्या दिवशी आपल्या भागीदारावर नजर कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. ते तुम्हाला नुकसान पोहचवू शकतात. आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : पैशांची योग्य गुंतवणूक होईल. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल. जोडीदारांसोबत तुम्ही सहलीचा प्लॅन बनवाल.

मीन (Pisces Horoscope Today) : धनलाभाची शक्यता. मनात शांती असेल. धाकटा भाऊ किंवा धाकटी बहीण तुमच्याकडे सल्ला मागतील. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. या राशीतील जातक आज रिकाम्या वेळेत रचनात्मक काम करण्याचा प्लॅन बनवतील. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com