Daily Horoscope 15 August Rashi Bhavishya: स्वातंत्र्य दिनी कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या

Daily Horoscope 15 August Rashi Bhavishya: स्वातंत्र्य दिनी कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मेष (Aries Horoscope Today) : नफा मिळण्याची शक्यता. व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करील. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मधे येऊ देऊ नका. आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus Horoscope Today) : बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कुणी वरिष्ठ व्यक्ती सोबत तुम्ही वेळ घालवू शकतात. कोणा तिसऱ्याने कान फुंकल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल.

मिथुन (Gemini Horoscope Today) : मनाला शांतता लाभेल. पैशांची स्थिती सुधारेल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत. या राशीतील जे लोक रचनात्मक कार्याने जोडलेले आहे आज त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा/तुमची जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल.

कर्क (Cancer Horoscope Today) : व्यवसायात उत्तम प्रगती. आर्थिक लाभ होईल. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजुबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करा.

सिंह (Leo Horoscope Today) : शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. जोडीदारासोबत बाहेर फिरण्याचा प्लॅन बनवाल.

कन्या (Virgo Horoscope Today) : देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा. मन:शांती लाभेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण प्रफुल्लित होईल. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल.

तूळ (Libra Horoscope Today) : आर्थिक समस्या येऊ शकते. तुमच्या पालकांसोबत तुमचा आनंद वाटा. एकटेपणा आणि उदासीनतेच्या भावनेमुळे दडपणाखाली असलेल्या पालकांना थोडे बरे वाटेल. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकतात.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळवा. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. या सोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात. संध्याकाळी तुमच्या मुलांबरोबर काही आनंदाचा काळ घालवा. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. मिळणाऱ्या सर्व संधींचे सोने करा.

धनु (Sagittarius Horoscope Today) : मानसिक ताणतणावर मात करण्यासाठी अध्यात्मिक, धार्मिक उपाययोजनांची सध्या तातडीची गरज. धन लाभ होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. रात्री ऑफिस मधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालवा.

मकर (Capricorn Horoscope Today) : आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. जोडीदारांसोबत वेळ घालवाल. फिरायाला जायचा प्लॅन बनवाल.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात.

मीन (Pisces Horoscope Today) : सट्टेबाजीतून नुकसान होण्याची शक्यता. वादग्रस्त विषय टाळा. अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप चढू शकतो आणि यामुळे त्यांचा बराच वेळ खराब होऊ शकतो.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com