Daily Horoscope 3 August Rashi Bhavishya: 'या' राशींना प्रवासाचा योग; पाहा तुमचे भविष्य

Daily Horoscope 3 August Rashi Bhavishya: 'या' राशींना प्रवासाचा योग; पाहा तुमचे भविष्य

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मेष (Aries Horoscope Today) : आर्थिक चिंता येऊ शकते. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील, पण उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल.

वृषभ (Taurus Horoscope Today) : ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज. आर्थिक लाभचा दिवस. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.

मिथुन (Gemini Horoscope Today) : प्रसन्नदायी आजचा दिवस. आर्थिक चिंता होईल परंतु, यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. कुटुंबासाठी एखादी आनंददायी बातमी येईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते.

कर्क (Cancer Horoscope Today) : प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमचे मानसिक दडपण कमी करणारा असेल. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामपण वाटेल.

Daily Horoscope 3 August Rashi Bhavishya: 'या' राशींना प्रवासाचा योग; पाहा तुमचे भविष्य
घरात मांजरीचे आगमन शुभ की अशुभ, जाणून घ्या 'या' संकेतांवरून

सिंह (Leo Horoscope Today) : उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवा. हुशारीने गुंतवणूक करा. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

कन्या (Virgo Horoscope Today) : आर्थिक लाभ होण्याची शक्यता. वातावरण प्रसन्न असेल. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे.

तूळ (Libra Horoscope Today) : शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठे ही इन्व्हेस्ट करू नका. कर्मकांडे अथवा शुभकार्याचे सोहळे घरीच केलेले चांगले ठरतील. कार्यालयीन काम फत्ते होईल. प्रवासाची शक्यता. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : आर्थिक गुंतवणूक करताना विचार करा. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल.

धनु (Sagittarius Horoscope Today) : तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. आर्थिक चिंता नक्कीच होईल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात, असे तुम्हाला वाटेल.

मकर (Capricorn Horoscope Today) : आजचा दिवस अत्यंत चांगला. आर्थिक लाभ संभवतो. भागीदारीतील प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतील. दुसऱ्यांना आपल्या स्वभावाचा फायदा घेऊ दिल्याबद्दल तुम्ही स्वत:वर विशेष रागावलेले असाल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : आज धन हानी होण्याची शक्यता. नातेवाईकांना भेटून त्यांच्यासमवेत वेळ घालविल्याने तुमचा फायदा होऊ शकेल. कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता. कुटुंबाला आवर्जून वेळ द्याल. लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल.

मीन (Pisces Horoscope Today) : व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालू शकतात.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com