Daily Horoscope 5 August Rashi Bhavishya: 'या' दोन राशींनी मादक पदार्थांपासून राहावे दूर; पाहा तुमचे भविष्य

Daily Horoscope 5 August Rashi Bhavishya: 'या' दोन राशींनी मादक पदार्थांपासून राहावे दूर; पाहा तुमचे भविष्य

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.

मेष (Aries Horoscope Today) : सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच चांगला आहे.

वृषभ (Taurus Horoscope Today) : तणावापासून थोडे मुक्त व्हाल. जीवनसाथीसोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. उत्तम दिवस आहे. सिनेमा, पार्टी आणि मित्रांसोबत फिरण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini Horoscope Today) : द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. व्यवसायात नफा या राशीतील व्यावसायिकांसाठी आज उत्तम स्वप्न खरे होण्यासारखे असेल.

कर्क (Cancer Horoscope Today) : अंगदुखीची दाट शक्यता. घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार, रोमान्सने भरलेले असेल. दारू किंवा सिगारेटचे खूप जास्त सेवन करणे आज तुमच्या आरोग्याच्या स्थितीला खराब करू शकते.

सिंह (Leo Horoscope Today) : टीका सहन करावी लागेल. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुमचे पालक तुमच्या जोडादाराला आज सुंदरशी भेट देतील. यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहे त्या विषयाच्या बाबतीत तुम्ही आपल्या गुरुजनांसोबत बोलू शकतात.

कन्या (Virgo Horoscope Today) : अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळेल, संयम सोडू नका.

तूळ (Libra Horoscope Today) : नव्या आर्थिक संधी लाभदायक. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास प्रोत्साहन देतील. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. कुणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो. तुमचा मित्र तुमचे खूप कौतुक करू शकतो. जोडीदारांचे मन दुखावू शकता.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुमचा/तुमची जोडीदार आज खूप छान मूडमध्ये आहे. आजच्या दिवशी बाहेरचे भोजन तुमच्या पोटाची स्थिती खराब करू शकते म्हणून, बाहेरचे खाऊ नका.

धनु (Sagittarius Horoscope Today) : आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात. कुटूंबातील सदस्यांसोबत संमेलन, एकत्रित कार्यक्रम केल्याने प्रत्येकाचा मूड चांगला बनेल. आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देऊ शकतात. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

मकर (Capricorn Horoscope Today) : धन संचित करण्याचा सल्ला घ्या. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे. दिवस उत्तम आहे.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. धन लाभ शक्यता. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. तुमच्या घरातील कुणी जवळचा व्यक्ती आज तुमच्या सोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल. आज तुमचा प्रिय मनमोकळा गप्पा मारेल.

मीन (Pisces Horoscope Today) : पैशांची शक्य तितकी काळजी घ्या. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल. आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली सतत आठवण ठेवतील. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अतिभावूक बोलू नका. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर संशय घेईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com