Weekly Rashi Bhavishya in Marathi 'या' राशीच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी

Weekly Rashi Bhavishya in Marathi 'या' राशीच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी

Published by  :
Vikrant Shinde

17 एप्रिल ते 23 एप्रिल हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या प्रमोद अरुणराव जोशी गुरुजींकडून…

मेष (Aries Horoscope):

मेष राशी जातकांसाठी हा सप्ताह सौख्य स्वरूपाचा राहील खूप दिवसापासून अर्धवट राहिलेली कामे या सप्ताहात पूर्ण होताना दिसून येतील नोकरदारांसाठी प्रमोशन घडून येईल आरोग्यासंबंधी काळजी घ्यावी लागेल.

वृषभ (Taurus Horoscope):

वृषभ राशि जातकांसाठी हा सप्ताह धार्मिक स्थळे व जवळचे प्रवास घडून येतील शैक्षणिक क्षेत्रातील मित्रांना आनंदी घटना कानावर पडतील थोर व्यक्तींच्या भेटी घडवून येतील घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील.

मिथुन (Gemini Horoscope):

मिथुन राशि जातका साठी हा सप्ताह नवनवीन जबाबदारी ची कामे मिळवून देईल या सप्ताहात केलेली आर्थिक गुंतवणूक भविष्यासाठी फायद्याची ठरेल स्थावर मालमत्ता संबंधी नवीन प्रश्न उद्भवतील.

कर्क (Cancer Horoscope):

कर्क राशीच्या जातकानी वाद-विवाद टाळावा घेतलेल्या निर्णयाबद्दल द्विधा मनस्थिती होण्याची शक्यता निर्णय डळमळू देऊ नये नातेवाईकांच्या मित्र-मैत्रिणींच्या भेटी घडवून येतील पोटाच्या तक्रारी उद्भवतील पोटाची काळजी घेणे आवश्यक.

सिंह (Leo Horoscope):

सिंह राशीचे जातकांना हा सप्ताह निराशाजनक जाईल पारिवारिक चिंता निर्माण होईल परंतु योग्य व्यक्तीकडून सल्ला घेऊन केलेली कामाची सुरुवात फायद्याची ठरू शकते काम करताना चिडचिड होईल परंतु संयम राखावा.

कन्या (Virgo Horoscope):

कन्या राशि जातक यासाठी हा सप्ताह आनंदाचा जाईल विवाह योग्य तरुण-तरुणीची विवाह ठरतील नवनवीन ओळखी निर्माण होतील घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल आर्थिक ता चिंता सप्त्या मध्ये चिंताग्रस्त वातावरण निर्माण करेल.

तुळ (Libra Horoscope):

तूळ राशीच्या जातकांसाठी हा सप्ताह मानसिकता संभ्रमात पाडणार असेल निर्णय घेताना योग्य-अयोग्य निवड स्वतःला संभ्रम निर्माण करेल परंतु घेतलेले काम अर्धवट सुटणार नाही याची दक्षता विशेष घ्यावी आरोग्यासंबंधी तक्रारी त्रास देतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope):

वृश्चिक राशि जातकांसाठी हा सप्ताह आनंद वार्ता घेऊन येणारा सप्ताह ठरेल कले संबंधी योग्य वाव मिळेल उष्ण प्रकृतीचे आजार सप्त्या मध्ये त्रास देतील प्रवास घडून येतील मित्र परिवारामध्ये पैशासंबंधी निर्णय घेताना काळजीपूर्वक विशेष लक्ष ठेवून करावे

धनु (Sagittarius Horoscope):

धनु राशी जातकांना हा सप्ताह स्थावर मालमत्ता घेण्यास प्रतिकूल काळ निर्माण होईल , पदोन्नतीच्या दृष्टीने हा सप्ताह उत्तम ठरेल विद्यार्थी मित्राना अनेक चांगल्या संधी निर्माण होतील आनंदी सप्ताह ठरेल.

मकर (Capricorn Horoscope):

मकर राशी जातका साठी हा साप्ताहिक आठवडा अनेक प्रकारे संधी निर्माण करेल परंतु संधीचे सोने हे करून घेणे हे महत्वाचे असेल , सरकारी कामे होताना अडचणी निर्माण होतील आठवड्याच्या शेवटी आनंदी वार्ता कानावर पडतील.

कुंभ (Aquarius Horoscope):

कुंभ राशी जातकासाठी सप्ताह आनंदी स्वरूपाचा असेल,केलेले कष्ट फायदा देण्याची वेळ आली आहे अश्या स्वरूपाचा हा आठवडा असेल, चिडचिड होऊ न देता शांत निर्णय फायद्याचे राहतील.

मीन (Pisces Horoscope):

मीन राशी जातका साठी हा सप्ताह प्रवास घडून आणेल नवीन नवीन संधी निर्माण होतील, प्रतिष्ठा मान मिळेलं योग्य मार्गदर्शन मिळेल वरिष्ठ सदस्या मार्फत प्रशंसा होईल.

बीड, महाराष्ट्र मोबाईल 98 50 610 215

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com