रक्षाबंधना दिनी 'या' 5 देवांना बांधता येईल राखी; भाऊ बनून आयुष्यभर करतील रक्षण

रक्षाबंधना दिनी 'या' 5 देवांना बांधता येईल राखी; भाऊ बनून आयुष्यभर करतील रक्षण

जर तुम्हाला भाऊ नसेल तर तुम्ही या पाच देवांना राखी बांधू शकता. ज्यांना भाऊ आहेत त्यांनीही भावाला राखी बांधण्यासोबतच या पाच देवांना राखी बांधली तर हे देव भाऊ बनून आयुष्यभर तुमचे रक्षण करतात.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन या सणाची जय्यत तयारी सुरू आहे. बहिणी आपल्या भावांसाठी राखी खरेदी करत आहेत, तर भाऊही आपल्या बहिणींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तूंच्या शोधात आहेत. पण, जर तुम्हाला भाऊ नसेल तर तुम्ही या पाच देवांना राखी बांधू शकता. ज्यांना भाऊ आहेत त्यांनीही भावाला राखी बांधण्यासोबतच या पाच देवांना राखी बांधली तर हे देव भाऊ बनून आयुष्यभर तुमचे रक्षण करतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

'य 5 देवांना राखी बांधता येते

गणपती बाप्पा

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाला आंघोळ करून आधी राखी बांधली तर तो तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतो आणि तुम्हाला बहीण मानून नेहमीच तुमचे रक्षण करतो.

भोलेनाथ

रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो आणि श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना आहे, म्हणून तुम्ही भोलेनाथलाही राखी बांधून किंवा शिवलिंगावर राखी अर्पण करून या दिवसाची सुरुवात करू शकता.

हनुमान

पवनपुत्र हनुमान हा भगवान शंकराचा रुद्र अवतार मानला जातो. त्यामुळे राखीच्या दिवशी हनुमानाला राखी बांधल्यास कुंडलीतील मंगळाचा प्रभाव कमी होतो. तसेच पवनपुत्र हनुमान आपल्याला शक्ती आणि बुद्धी देतो.

कृष्ण

रक्षाबंधनाच्या निमित्ताने कृष्णाला राखी बांधून तुम्ही त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता. असे म्हणतात की शिशुपालाच्या वधाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाच्या हातातून रक्तस्त्राव होऊ लागला, म्हणून द्रौपदीने तिच्या साडीचा पल्लू फाडून कृष्णाच्या हातावर बांधला, त्यामुळे द्रौपदीचे अपहरण झाले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण केले होते. त्याचप्रमाणे तुम्ही जर लाडू गोपाळला राखी बांधली तर तो तुमचे रक्षण करतो.

नागदेव

रक्षाबंधनाच्या दिवशी नागदेवतेला राखी अर्पण केल्यास कुंडलीतील सर्प दोष दूर होतो. तसेच तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत असेल तर ही समस्याही नागदेव दूर करते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com