ऋषीपंचमीचे व्रत उद्या; जाणून घ्या पूजा पद्धती आणि महत्त्व

ऋषीपंचमीचे व्रत उद्या; जाणून घ्या पूजा पद्धती आणि महत्त्व

हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ऋषी पंचमी व्रत पाळले जाते. गणेश चतुर्थीच्या एक दिवसानंतर हा सण साजरा केला जातो.

Rishi Panchami 2023 : हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ऋषी पंचमी व्रत पाळले जाते. गणेश चतुर्थीच्या एक दिवसानंतर हा सण साजरा केला जातो. यंदा हा ऋषीपंचमीचा सण 20 सप्टेंबरला आहे. मान्यतेनुसार, हा दिवस विशेषतः भारतातील ऋषींचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. ऋषीपंचमीच्या दिवशी उपवास केल्याने चुकांना क्षमा मिळते. अशा परिस्थितीत ऋषी पंचमी व्रताच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

ऋषीपंचमीचे व्रत उद्या; जाणून घ्या पूजा पद्धती आणि महत्त्व
गणपतीला का आवडतात दुर्वा? 'या' चमत्कारी उपायांनी होतील सर्व इच्छा पूर्ण

ऋषी पंचमीचे महत्त्व

ऋषीपंचमीचा दिवस प्रामुख्याने सप्तऋषींना समर्पित असतो. धार्मिक कथांनुसार हे सात ऋषी म्हणजे वशिष्ठ, कश्यप, अत्री, जमदग्नी, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाज. या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि सप्तऋषींचा आशीर्वादही प्राप्त होतो, अशीही धारणा आहे.

ऋषी पंचमी 2023 मुहूर्त

पंचांगानुसार, मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी दुपारी 01:43 वाजता पंचमी तिथी सुरू होईल. ही तारीख 20 सप्टेंबर रोजी दुपारी 02:16 वाजता संपेल. उदय तिथीनुसार 20 सप्टेंबर रोजी ऋषीपंचमीचे व्रत पाळण्यात येणार आहे. ऋषी पंचमीच्या पूजेची वेळ सकाळी 11:19 ते 01:45 पर्यंत आहे.

ऋषी पंचमीच्या पूजेची पद्धत

20 सप्टेंबरला ऋषी पंचमीला सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर, घर आणि मंदिर पूर्णपणे स्वच्छ करा. उदबत्ती, दिवा, फळे, फुले, तूप, पंचामृत इत्यादी पूजेचे साहित्य गोळा करा. एका पाटावर त्यावर लाल किंवा पिवळे कापड पसरवावे व त्यावर सप्तर्षींचा फोटो ठेवा. आता त्यांना फळे, फुले, नैवेद्य वगैरे अर्पण करा आणि तुमच्या चुकांची माफी मागा. यानंतर आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com