Shravan Somvar 2023 :दुसरा श्रावण सोमवार विष्णू आणि शिवपूजनाचा शुभ योग

Shravan Somvar 2023 :दुसरा श्रावण सोमवार विष्णू आणि शिवपूजनाचा शुभ योग

आज दुसरा श्रावणी सोमवार असून, प्रत्येक श्रावणी सोमवारी वाहिली जाणारी शिवामूठ महत्त्वाची मानली जाते. याचे महत्त्वही वेगवेगळे आहे. तसेच या दुसऱ्या श्रावणी सोमवारी इतरही अनेक अद्भूत आणि शुभ योग आणि उत्सव जुळून आले आहेत. जाणून घेऊया.

श्रावण महिन्यात असलेले शिवपूजनाचे महत्त्व सर्वश्रुत आहे. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो. 28 ऑगस्ट 2023 रोजी श्रावणी सोमवार आहे. हा दुसरा श्रावणी सोमवार असून, प्रत्येक श्रावणी सोमवारी वाहिली जाणारी शिवामूठ महत्त्वाची मानली जाते. याचे महत्त्वही वेगवेगळे आहे. तसेच या दुसऱ्या श्रावणी सोमवारी इतरही अनेक अद्भूत आणि शुभ योग आणि उत्सव जुळून आले आहेत. जाणून घेऊया.

दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ

सोमवार ८ ऑगस्ट २०२२ रोजी दुसरा श्रावणी सोमवार आहे. यानंतर, १५ ऑगस्ट २०२२ रोजी तिसरा श्रावणी सोमवार आणि २२ ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार असणार आहे. प्रत्येक सोमवारी शिवपूजन करताना महादेवाला शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून तीळ वाहण्याची प्रथा आहे.

श्रावणी सोमवारचे शिवपूजन

श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा. मात्र, जे आजारी अथवा अशक्त असतील त्यांनी रात्री भोजन करावे. पूजेआधी व्रताचा संकल्प करावा. नंतर शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळाची शिवामूठ वाहताना 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।' हा मंत्र म्हणावा.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com