Shravan Somvar 2023 : पहिला श्रावण सोमवार, जाणून घ्या पूजा, महत्त्व

Shravan Somvar 2023 : पहिला श्रावण सोमवार, जाणून घ्या पूजा, महत्त्व

आज म्हणजेच 21 ऑगस्टला श्रावणातला पहिला सोमवार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज म्हणजेच 21 ऑगस्टला श्रावणातला पहिला सोमवार आहे. श्रावण महिन्यात भाविक भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करतात. उपवास देखिल ठेवला जातो. 17 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावणात महादेवाची रोज सकाळी पुजा केली जाते. पण श्रावणातील सोमवारला खुप खास महत्व आहे.

१७ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. या श्रावणात चार सोमवार आले आहे. पहिला श्रावण महिना हा आज असून दुसरा २८ ऑगस्ट, तिसरा ४ आणि ११ सप्टेंबर या दिवशी असणार आहे. सोमवारी उपवास ठेवून फलाहार केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. श्रावण महिन्यात भाविक भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करतात.

पुजा कशी करावी?

श्रावण महिन्यात सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. यानंतर तुमच्या घरातील भगवान शंकराला गंगाजल,दूध,दही,मधाने अभिषेक करावा. शिवलिंगावर बेलाचे पान अर्पण करावे. देवाची मनोभावे पूजा करुन प्रार्थना करावी.

शुभ काळ

श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी २१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १२ वाजून ५३ मिनिटापासून सुरू होऊन २१ ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत राहील.

श्रावण सोमवार महत्व

श्रावण सोमवार हा सणा सारखा भारतात साजरा केला जातो. या महिन्याची शिवभक्तांना वर्षभर प्रतीक्षा असते. भारतात तसेच इतर देशांमध्ये राहणारे हिंदू लोक हा महिना उत्साहाने साजरा करतात. श्रावण महिन्यातील सोमवारी लोक शिवाला समर्पित व्रत करतात. या पवित्र महिन्यात शिवभक्त उपवास करतात, प्रार्थना करतात आणि काही धार्मिक विधी देखील करतात. लोक मंदिरांमध्ये शिवलिंगाला दूध, पाणी आणि इतर नैवेद्य देतात. आदिदेव महादेवाच्या भक्तीमुळे जीवनात समृद्धी आणि आनंद मिळतो अशी लोकांची श्रद्धा आहे. या महिन्यात भक्त उत्तराखंडमधील हरिद्वारला कावड यात्रा (तीर्थयात्रा) करतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com