नवीन वर्षातील पहिली विनायक चतुर्थी आज; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

नवीन वर्षातील पहिली विनायक चतुर्थी आज; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते, म्हणजेच वर्षभरात एकूण १२ वरद विनायक चतुर्थी असतात.

Vinayak Chaturthi 2024 : नवीन वर्षातील पहिली विनायक चतुर्थी 14 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच आज आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते, म्हणजेच वर्षभरात एकूण १२ वरद विनायक चतुर्थी असतात. ही तिथी शिव गौरीचा पुत्र गणपतीला समर्पित आहे. पुराणानुसार या दिवशी बाप्पाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, आर्थिक समृद्धी तसेच ज्ञान आणि बुद्धी प्राप्त होते.

विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त

पौष विनायक चतुर्थी तारीख 14 जानेवारी 2024 रोजी सुरू होईल. पूजा मुहूर्त सकाळी 11.27 ते दुपारी 01.33 वाजेदरम्यान असेल.

विनायक चतुर्थी पूजा मंत्र

ऊँ एकदंताय नम:

ऊँ गजकर्णाय नम:

ऊँ लंबोदराय नम:

ऊँ विकटाय नम:

ऊँ विघ्ननाशाय नम

ऊँ विनायकाय नम:

ऊँ गणाध्यक्षाय नम:

ऊँ भालचंद्राय नम:

ऊँ गजाननाय नम:

विनायक चतुर्थी पूजा पद्धत

विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला. यानंतर पूजा करण्याचा संकल्प घ्या आणि दिवसभर उपवास ठेवा. पूजेच्या ठिकाणी मातीची किंवा धातूची गणेशमूर्ती स्थापित करा. शुभ मुहूर्तावर हळद, कुंकु, अबीर, गुलाल लावून बाप्पाची पूजा करावी. दुर्वा अर्पण करा आणि लाडू किंवा मोदक अर्पण करा. गणपती चालिसा पठण करा. पूजेच्या वेळी वरील मंत्रांचे पठण करत रहा. गाईला गूळ आणि तूप खाऊ घालावे. ब्राह्मणाला अन्नदान करा आणि दक्षिणा द्या. त्यानंतर सायंकाळी श्रीगणेशाची पूजा व आरती. आणि उपवास सोडा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com