बी.एस.येदियुरप्पा यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

बी.एस.येदियुरप्पा यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Published by :
Published on

कर्नाटकमध्ये खांदेपालट होण्याचे संकेत अनेक दिवसांपासून वर्तवण्यात आले होते. अखेर आज येदियुरप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आहेत. पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले की तुम्हालाही त्याबाबत कळेलच, असे येदियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते.

आपण केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य करू याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता. आपण समाधानी असून पक्षाची शिस्त मोडणार नाही, असेही ते म्हणाले होते. बी.एस.येदियुरप्पा आज दुपारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. येदियुरप्पा यांनी भाजपा सरकारच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला. दुपारी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना आपण राजीनामापत्र देणार असल्याचे येदियुरप्पा म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com