India
‘देशात किमान सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाउन हवा’
कोरोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये फैलाव रोखण्यासाठी किमान पुढील सहा ते आठ आठवडे लॉकडाउन ठेवला पाहिजे, असं मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये चाचणीमध्ये संसर्ग दर १० टक्क्यांच्या पुढे आहे तिथे लॉकडाउन लावण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
बलराम भार्गव यांनी यावेळी मोदी सरकारवर टीका केली नाही, मात्र कोरोना संकटाला उत्तर देण्यास उशीर झाल्याचं मान्य केलं. "मला वाटतं १० टक्क्यांची शिफारस मान्य कऱण्यास उशीर झाला. १५ एप्रिलला टास्क फोर्सने सरकारला १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असणाऱ्या ठिकाणी लॉकडाउन करण्याची शिफारस केली होती," अशी माहिती त्यांनी दिली.