ICSE Results 2021: आयसीएसईचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर
आयसीएसई २०२१ आणि आयएससी २०२१ चा निकाल जाहीर झाला आहे. काऊन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) आयसीएसई (इ. १० वी) आणि आयएससीचा (इ. १२ वी) निकालाची तारीख नुकतीच घोषित केली.आज दुपारी ३ वाजता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीआयएससीईच्या संकेतस्थळावर (cisce.org आणि results.cisce.org) जाऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
विद्यार्थी एसएमएसच्या माध्यमातूनही त्यांचा निकाल पाहू शकतात. कोरोना संकटामुळे आयसीएसई आणि आयएससीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएसवर पाहता येणार आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचा यूनिक आयडी 09248082883 क्रमांकावर पाठवावा.ICSE/ISC (Unique ID) या फॉरमॅटमध्ये एमएसएस केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एमएमएसवर पाहता येणार आहे.
● आयएससी विभागवार निकाल :
उत्तर : ९९.७५ टक्के
पूर्व : ९९.७० टक्के
पश्चिम : ९९.९१ टक्के
दक्षिण : ९९.९१ टक्के
परदेश : १०० टक्के
● आयसीएसई विभागवार निकाल :
उत्तर : ९९.९७ टक्के
पूर्व : ९९.९८ टक्के
पश्चिम : ९९.९९ टक्के
दक्षिण : १०० टक्के
परदेश : १०० टक्के