भारतीय हवाई दलाचे मिग – २१ लढाऊ विमान क्रॅश
राजस्थानच्या बाडमेर येथे भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले आहे. हवाई दलाचे मिग -२१ बाइसन लढाऊ विमान कोसळले आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे अपघातात पायलट सुखरूप आहे. प्रशिक्षणादरम्यान हे विमान कोसळल्याची माहिती मीळत आहे. एनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यापासून ३५ किमी दूर असलेल्या मातसर गावाजवळ संध्याकाळी ५ च्या सुमारास हवाई दलाचे मिग विमान कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, वैमानिक सुरक्षित आहे. बाडमेरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, मिग क्रॅश झाल्याची माहिती मिळाली आहे, त्यानंतर पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखले झाले आहेत. अग्निशमन दलही घटनास्थळी आहे.
त्याचबरोबर अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले आहेत. या घटनेनंतर उत्तरलाई हवाई दलाचे अधिकारी हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचत आहेत. त्याचबरोबर गावकऱ्यांनी पाण्याचे टँकरच्या सहाय्याने आग विझवली.