Indian Navy Recruitment | इंडियन नेव्हीमध्ये मोठी भरती

Indian Navy Recruitment | इंडियन नेव्हीमध्ये मोठी भरती

Published on

इंडियन नेव्हीमध्ये नौसैनिक (सेलर्स) भरतीसाठी नौदलाकडून एक अपडेट प्रसिद्धपत्र प्रकाशित करण्यात आला आहे. भरती पोर्टल joinindiannavy.gov.in वर भारतीय नौदलाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, सेलर्स एंट्री – एए-150 आणि एसएसआर-02/2021 बॅचसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 एप्रिलपासून सुरू होऊ शकेल, जी 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. प्रत्येक वर्षी आर्टिफिशर ऍप्रेंटिस (एए) आणि सिनिअर सेकंडरी रिक्रुट्‌स म्हणून नियुक्त केले जाते.

पाहा काय आहेत पात्रतेचे निकष?
नेव्ही सेलर्स एंट्री अंतर्गत आर्टिफिशर ऍप्रेंटिस भरतीसाठी तेच उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांना गणित व भौतिकशास्त्र विषयांसह केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा केंद्रीय किंवा राज्य मान्यताप्राप्त मंडळाकडून कॉम्प्युटर सायन्स विषयात किमान 60 टक्के गुणांसह 12 परीक्षा पास असावा. तसेच, उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या तारखेनुसार 17 वर्षांपेक्षा कमी आणि 20 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

तसेच सिनिअर सेकंडरी रिक्रुट्‌स (एसएसआर) भरतीसाठी गणित व फिजिक्‍स विषयासह केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्ससह किमान 60 टक्के गुणांसह 12 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. तसेच, उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या तारखेनुसार 17 वर्षांपेक्षा कमी आणि 20 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com