India
IT कंपन्यात ३० लाख लोकांच्या नोकऱ्यावर गदा
पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ साली भारतात आयटी कंपन्यात काम करणाऱ्या 30 लाख लोकांच्या नोकऱ्यावर गदा येण्याची शक्यता आहे. बँक ऑफ अमेरिकेने जाहीर केलेल्या एका अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऑटोमेशन प्रक्रियेमुळे या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.
भारतातील विप्रो, कॉग्निजंट, इन्फोसिस या सारख्या बड्या आयटी कंपन्या आहेत, त्यामधील 30 लाख नोकऱ्या जाऊ शकतात असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. ऑटोमेशनचा फटका हा भारतासह अमेरिकेलाही बसणार असून त्या देशातीलही 10 लाख नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

