India
नव्या केंद्रीय आयटी मंत्र्यांनी ट्विटरला सुनावलं
ट्वीटर आणि केंद्र यांच्यातील वाद काही नवीन नाही. नवीन नियमावलीमुळे हे वाद होतच असतात. आता नवे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पदभार स्वीकारत ट्वीटरचा समाचार घेतला.
ट्विटरला भारतातील आयटी नियमांचं पालन करावंच लागेल अशा शब्दात अश्विनी वैष्णव यांनी त्यांनी खडसावलं आहे. "देशातील कायदा सर्वोच्च आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागेल. ट्विटरलाही कायद्याचं पालन करावं लागेल.", असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
वैष्णव हे ओडिशामधून भाजपाचे खासदार आहेत. सध्या त्यांच्याकडे महिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. तसेच ते रेल्वेमंत्रालयाचे प्रभारी आहेत. भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या जागी त्यांची वर्णी लागली आहे. पदाभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं आहे.