असा भरता येईल ITR; अवघे तीन दिवस शिल्लक

असा भरता येईल ITR; अवघे तीन दिवस शिल्लक

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क | प्राप्तिकर विभागाने ट्वीट करून माहिती दिली आहे कि, आता तुमच्याकडे केवळ 3 दिवस शिल्लक आहेत, लवकरात लवकर ITR भरण्याचे काम पूर्ण करा.

जर तुम्ही वेळेत आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला विभागाकडून दंड आकारला जातो. जर करदात्यांनी 10 जानेवारी 2021 नंतर आयटीआर फाइल केला तर त्यांना 10,000 रुपये लेट फी द्यावी लागेल. असे होऊ नये म्हणून खालील पद्धतीने आयटीआर भरा.

खालील पद्धतीने भरता येईल आयटीआर :

  • प्रथमतः इन्कम टॅक्स ई-फाइलिंग पोर्टलवर जा. युजर आयडी (PAN), पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.
  • 'e-File' मेन्यूवर क्लिक करा आणि त्यानंतर 'Income Tax Return' च्या लिंकवर क्लिक करा.
  • इन्कम टॅक्स रिटर्न पेज आपणहून भरलेले दिसेल.
  • आता असेसमेंट ईयर, आईटीआर फॉर्म नंबर, फाइलिंग टाइपमध्ये 'ओरिजिनल/ रिवाझ्ड रिटर्न' यापैकी पर्याय निवडा. यानंतर सबमिशन मोडमध्ये 'प्रीपेयर अ‍ॅण्ड सबमिट ऑनलाइन' वर क्लिक करा.
  • यानंतर 'Continue' वर क्लिक करा. याठिकाणी असणारी मार्गदर्शक तत्त्वे सावधानतेने वाचा आणि फॉर्म नीट वाचून भरा.
  • फॉर्म भरल्यानंतर 'टॅक्स पेड अ‍ॅण्ड व्हेरिफिकेशन टॅब' मध्ये उपयुक्त व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडा.
  • यानंतर 'प्रीव्यू अ‍ॅण्ड सबमिट' वर क्लिक करा.
  • जर तुम्ही 'ई-व्हेरिफिकेशन'चा पर्याय निवडला आहे, तर तुम्ही ईव्हीसी किंवा ओटीपी पैकी कोणत्यही एका मार्गाने ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करू शकता.
  • यानंतर तुम्ही आयटीआर सबमिट करू शकता.
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com