जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद, 12 गंभीर जखमी

जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद, 12 गंभीर जखमी

Published by :
Published on

श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात झेवानजवळ दहशतवाद्यांनी सोमवारी जम्मूमध्ये पोलिसांच्या वाहनावर गोळीबार केला. दहशतवादी हल्ला 25 जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. 14 पोलीस जखमी, 2 शहीद, 12 धोक्याबाहेर . सर्व जखमी यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे .

हा हल्ला श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात झेवानजवळ येथे आज(सोमवार) सायंकाळी झाला. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र पोलीस बटालियनच्या बसवर हा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी या बस वर मोठ्याप्रमाणात गोळीबार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

तसेच, प्राप्त माहितीनुसार दुचाकीवर आलेल्या दहशतवाद्यांनी बसवर बेछूट गोळीबार केला. जम्मू-काश्मीर पोलिसांची ही बस बुलेटप्रुफ नव्हती. त्यामुळे या हल्ल्यात पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले. हल्ला झाल्यानंतर पोलीस दलाने या संपूर्ण परिसरास वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू केली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com