जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

बीसीसीआय सचिव जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) अध्यक्षपदी शनिवारी सर्वसंमतीनं निवड करण्यात आली. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजमूल हसन पापोन यांच्याजागी जय शाह यांची निवड झाली आहे. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी टि्वट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

'आशियाई क्रिकेट परिषद तुमच्या नेतृत्वात यशाचं शिखर गाठेल. आशियातील खेळाडुंना याचा लाभ होईल, अशी अपेक्षा यावेळी धुमल यांनी व्यक्त केली.

जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव आहेत. जय शाह यांची बीसीसीआयच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर विरोधकांकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता. कन्हैय्या कुमारने जय शाह यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जय शाह यांना कुठल्या मेरिटच्या आधारावर बीसीसीआयचं सेक्रेटरी बनवण्यात आलं, असा सवाल कन्हैय्या यांनी उपस्थित करत नियुक्तीवर टीका केली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com