जयप्रभा बचावासाठी सलग 19 व्या दिवशी आंदोलन; फेस मास्क घालून काढली मूक पदयात्रा

जयप्रभा बचावासाठी सलग 19 व्या दिवशी आंदोलन; फेस मास्क घालून काढली मूक पदयात्रा

Published by :
Published on

सतेज औंधकर, कोल्हापूर | कोल्हापूरचा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ (Jayprabha Studio) वाचवण्यासाठी आज लक्षवेधी फेस मास्क घालून मूक पदयात्रा काढण्यात आली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांनी हे आंदोलन केले.

कोल्हापूरचा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ (Jayprabha Studio) वाचवण्यासाठी गेले 18 दिवस साखळी उपोषण करण्यात येत आहे. आज आंदोलनाच्या 19 व्या दिवशी जयप्रभा बचावचे (Jayprabha Studio) लक्षवेधी फेस मास्क घालून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून मूक पदयात्रा काढली. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास खरी कॉर्नर येथून या पदयात्रेला सुरुवात झाली. लक्षवेधी असणाऱ्या पदयात्रेमध्ये सर्वांनी आपल्या चेहऱ्यावर फेस मास्क घातले होते. या फेस मास्क वर जयप्रभा बचाव (Jayprabha Studio) असं लिहिलं होतं तसेच डोळ्यातून अश्रुचे थेंब पडतानाचे ही दाखवली गेलेत. पदयात्रेतील प्रत्येकाच्या हातात जयप्रभा स्टुडिओ (Jayprabha Studio) चे महत्व पटवून देणारे फलकही देण्यात आले आले होते. भविष्यात जयप्रभा स्टुडिओ (Jayprabha Studio) वाचण्यासाठी विकत घेणाऱ्यांच्या घरावर देखील मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com