Covid-19 updates
कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण
कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ट्विटकरून दिली कोरोना झाल्याची माहिती.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे.आपणा सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.