रावसाहेब दानवे वाचाळवीर आहेत: सकल मराठा क्रांती मोर्चा, नाशिक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यांचा निषेध करण्यात आला होता. तसेच भाजपचे रावसाहेब दानवे ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे राज्यभरात त्यांचादेखील निषेध करण्यात येत आहे.
सकल मराठा क्रांती मोर्चा, नाशिक ह्या मुद्यावरून चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सकल मराठा क्रांती मोर्चाचे 'करण गायकर' माध्यमांशी बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जिथून आणलं आहे तिथे परत घेऊन जा व ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा इतिहास माहित असेल अशी एखादी व्यक्ती राज्यपाल म्हणून पाठवा अशी मागणी करण्यात केली आहे. तर, रावसाहेब दानवे वाचाळवीर आहेत असंही ते म्हणाले. तसेच, रावसाहेब दानवेंनी नाशिकमध्ये पाय ठेवून दाखवावा असे आव्हान सकल मराठा क्रांती मोर्चा, नाशिककडून देण्यात आले आहे.

