Bhaubeej 2023 : भाऊबीजेला भावाचं औक्षण करताना ताटात ठेवा 'या' वस्तू

Bhaubeej 2023 : भाऊबीजेला भावाचं औक्षण करताना ताटात ठेवा 'या' वस्तू

भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला सण म्हणजे भाऊबीज.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात. भाऊबीज हा बहीण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस.

ओवाळणीच्या ताटात काय काय असावं?

कुंकू - भावाच्या कपाळावर कुंकू लावून ओवाळणीला सुरूवात केली जाते. यामुळे रक्षण होतं असा समज आहे.

अक्षता- अक्षता म्हणजे तांदूळ. कोणत्याही शुभ कार्यात त्याचा अवश्य समावेश केला जातो.

कापूस आणि सोन्याची अंगठी - ओवाळणीच्या वेळेस भावाच्या डोक्यावर कापूस आणि अंगठी ठेवली जाते.

नारळ - नारळ अर्थात श्रीफळाला देखील ओवाळणीच्या ताटात महत्त्व आहे.

दिवा- तूपाचा किंवा तेलाचा दिवा/ निरंजन याने भावाचं औक्षण करण्याची प्रथा आहे.

गोडाचा पदार्थ - ओवाळणीची सांगता भावाला गोडाचा पदार्थ भरवून केली जाते.

भाऊबीजेला ओवाळताना प्रथम भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावा. त्यावर अक्षता लावा. अंगठी भावाच्या डोक्याला लावा. दिव्याचं ताट भावाच्या चेहऱ्यासमोर पाच वेळेस फिरवा. त्यानंतर गोडाचा पदार्थ भरवून भावाचा आशीर्वाद घ्या. ओवाळणी झाल्यानंतर बहीण - भाऊ एकमेकांना प्रेमाची वस्तू भेट म्हणून देतात.

सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लोकशाही मराठी न्यूज पुष्टी करत नाही.

Bhaubeej 2023 : भाऊबीजेला भावाचं औक्षण करताना ताटात ठेवा 'या' वस्तू
भाऊबीजेला भावाचे तोंड गोड करण्यासाठी बनवा 'हे' छान गोडाचे पदार्थ
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com