Pashchim Maharashtra
कोरेगाव भीमा दंगल प्रकरण; विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलावणार
चंद्रशेखर भांगे | कोरेगाव भीमा दंगली प्रकरणात आता मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. वकील ऍड आशिष सातपुते यांनी या संदर्भात आयोगासमोर अर्ज केला आहे. त्यामुळे आता विश्वास नांगरे पाटील यांची चौकशी होणार आहे.
1 जानेवारी 2018 ला विजयस्तंभ जवळ असलेल्या कोरेगाव-भीमा याठिकाणी दोन समुहात दंगल झाली होती. त्यावेळेस विश्वास नांगरे पाटील तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते.त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी कोरेगाव-भीमा आयोग बोलवणार आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे वकील ऍड आशिष सातपुते यांनी नांगरे पाटलांना चौकशी कामी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर बोलवण्यासाठी आयोगासमोर अर्ज दाखल केलाय.