देवभुमीत भक्तांची अफाट गर्दी… कोरोना नियमांचे तीन तेरा

देवभुमीत भक्तांची अफाट गर्दी… कोरोना नियमांचे तीन तेरा

Published by :
Published on

देशात कोरोनाने पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. परंतु १२ वर्षातून एकदा होणारा कुंभमेळा सध्या करोनाच्या संकटात पार पडत आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक अशी ओळख असणाऱ्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

एकीकडे कोरोनाचा उद्रेक होत असताना दुसरीकडे यावेळी लोकांकडून कोरोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन करण्यात आलं. यावेळी कुंभमेळ्यात मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन यावेळी करण्यात आलं नाही.

गंगा नदीत स्नान करण्यासाठी पवित्र दिवस मानल्या जाणाऱ्या शाही स्नानाच्या एक दिवस आधी लाखोंच्या संख्येने भक्तांनी नदीकिनारी गर्दी केली होती. आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमांचं जाहीरपणे हे उल्लंघन होतं.

हरिद्वारला येताना भाविकांना निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं सरकारने अनिवार्य केलं होत.

देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असून गेल्या २४ तासांत दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. कुंभमेळ्यासाठी सर्व नियमांचं पालन केलं जात असलं तरी तज्ञांनी गर्दी करु नये आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. अनेक भक्तांनी याठिकाणी गाईडलाइन्सचं पालन करणं शक्य नसल्याचं सांगितल आहे.

शाही स्नान करण्यासाठी झालेली गर्दी

हरिद्धारमध्ये गेल्या २४ तासांत ३८६ करोना रुग्ण आढळले आहेत. शहरात सध्या २०५६ रुग्ण कोरोना बाधित आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com