‘अर्णबआधी रविश कुमारला मुलाखत द्या’

‘अर्णबआधी रविश कुमारला मुलाखत द्या’

Published by :
Published on

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा यानं पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. बुधवारी पंतप्रधान मोदींनी 'परीक्षा पे चर्चा 2021' या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी दूरचित्र माध्यमाद्वारे संवाद साधला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कठीण प्रश्नाला आधी सामोरे जा. पंतप्रधानांनी यावेळी विद्यार्थ्यांना अनेक सल्ले दिले. यावरुन कुणाल कामरानं मोदींना टोला लगावला आहे.

जे आवडते ते आपण आधी करतो, विद्यार्थी सहज, सोप्या आणि त्यांना आवडणाऱ्या विषयाचा जास्त अभ्यास करतात आणि कठीण विषयाला घाबरतात. उलट कठीण असतं त्याला आधी सामोरे जा. परीक्षेत असं म्हटलं जातं की सोपं आधी सोडवा, पण मी तर म्हणेन जे कठीण आहे त्याचा निपटारा सर्वात आधी करायला हवा", असं मोदी म्हणाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना स्वतःच्या जीवनातील उदाहरण देताना मोदींनी, मी माझी सकाळ कठीण निर्णय घेऊन सुरू करतो असं सांगितलं, असं मोदींनी म्हटलं होतं.

दरम्यान, यावरुनच कुणालनं मोदींना टोला लगावला आहे. असं असेल तर पुढच्यावेळी अर्णब गोस्वामीला मुलाखत देण्याऐवजी रविश कुमार यांना मुलाखत देण्याचा प्रयत्न करून बघावा' असं कुणालनं म्हटलं आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पंतप्रधान मोदींनी मुलाखत दिलेली आहे. मात्र, रविश कुमार यांना आतापर्यंत मोदींनी एकही मुलाखत दिली नाही. मध्यंतरी रविश कुमारांनी पंतप्रधान मोदींना मुलाखत देण्याचं आव्हान दिलं होतं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com