लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली, AIIMS मध्ये दाखल

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली, AIIMS मध्ये दाखल

Published on

आरजेडी अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आले आहे. दिल्ली एम्सच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.त्यांना नेमका कसला त्रास झाला आहे, ते स्पष्ट नाही.

लालू यादव यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ठीक नाहीये. प्रकृतीच्या कारणामुळे तुरुंगात असतानाही त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्याआधी त्यांच्यावर रिम्समध्ये उपचारही सुरू होते.

दिल्ली एम्सच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये आज लालू यादव यांना दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांना नेमका कसला त्रास झाला आहे, ते स्पष्ट नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे लालू यादव गुरुवारी पाटण्याहून दिल्लीला रवाना झाले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com