शुगर नियंत्रीत करण्यासाठी हा उपाय करा...

शुगर नियंत्रीत करण्यासाठी हा उपाय करा...

Published by :
Saurabh Gondhali

वेटलॉस आणि शुगर कंट्रोल या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी कशा प्रकाराचा नाश्ता करावा, याविषयीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या dietitian_manpreet या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आहारतज्ज्ञ असं सांगत आहेत की वेटलॉस कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन या हार्मोनची मोठी भुमिका असते. याशिवाय इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित असणं शुगर असणाऱ्यांसाठीही खूप गरजेचं आहे. म्हणूनच इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवून शुगर कंट्रोल आणि वेटलॉस या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरणारे काही ब्रेकफास्ट पदार्थ.

१. हरबऱ्याच्या डाळीचं पनीर टाकून केलेलं धीरडं आणि पुदिना- कोथिंबीर चटणी

२. पाठीच्या म्हणजेच हिरव्या मुगाच्या डाळीचा डोसा आणि नारळाची चटणी

३. भरपूर भाज्या आणि पनीर घालून केलेले पोहे

४. पनीर स्टफ ज्वारीचा पराठा आणि घरी केलेलं एखादं लोणचं

५. ओट्स आणि ढोकळा

६. बेसन आणि गव्हाचं पीठ घालून केलेला पराठा आणि घरचं लोणचं

७. ओट्स आणि मुगडाळ घालून केलेली इडली आणि त्यावर कढीपत्ता टाकून घातलेली फोडणी

८. ओट्स, २ अक्रोड आणि सब्जा घालून दह्यामध्ये केलेलं पुडींग

९. हरबरा स्प्राऊट, पनीर टीक्की आणि पुदिना चटणी

१०. प्रोटीन किक Smoothie- यासाठी १ मुठभर रोस्टेड मखाना, दोन टीस्पून सातुचं पीठ, २०० मिली नारळाचं पाणी किंवा साधं दूध, अर्ध केळ, चिमूटभर वेलची पावडर आणि एक खजूर एवढं साहित्य लागेल. हे सगळं साहित्य मिक्सरच्या पॉटमध्ये टाका आणि त्याची छान स्मुथी करा. प्रोटीन रिच असणारी ही स्मुथी अतिशय पौष्टिक आहे.  

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com