नवरात्रीच्या नऊ दिवसांचे ९ रंग, जाणून घ्या महत्व आणि मान्यता

नवरात्रीच्या नऊ दिवसांचे ९ रंग, जाणून घ्या महत्व आणि मान्यता

नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा मातेची पूजा करताना 9 रंगाचे कपडे घाला, 9 आवडते रंग आणि महत्त्व जाणून घ्या
Published by :
shweta walge
Published on

कुठलाही सण-उत्सव साजरा करताना त्याचे काही नियम असतात. विशेषत: हा उत्सव देवादिकांशी जोडलेला असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या काळात देवीच्या विविध अवतारांची पूजा केली जाते. 9 रंगाचे कपडे घातले जातात, यामुळे देवी प्रसन्न होते. अशी धारणा आहे. 9 देवींचे 9 आवडते रंग जाणून घ्या.

१५ ऑक्टोबर रविवार- नारंगी रंग

शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापनासोबत शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. देवीला केशरी रंग आवडतो. केशरी रंग ऊर्जा आणि आनंदाची भावना देतो. केशरी रंग सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो.

१६ ऑक्टोबर सोमवार- पांढरा रंग

नवरात्रीचा दुसरा दिवस [16 ऑक्टोबर] ब्रह्मचारिणी देवीला समर्पित केला जाते. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान केल्याने देवीसोबत भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त होतो. सफेद हे पवित्रता आणि शांतीचे प्रतीक आहे, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो.

१7 ऑक्टोबर मंगळवार- पांढरा रंग

17 ऑक्टोबर रोजी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाईल. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ राहील. लाल रंग हा दुर्गेचा सर्वात आवडता रंग मानला जातो. लाल रंग शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

१८ ऑक्टोबर बुधवार- गडद निळा

18 ऑक्टोबर हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे. या दिवशी गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पूजा करा. असे मानले जाते की, हा रंग आनंदाची भावना देतो. यामुळे समृद्धी वाढते.

१९ ऑक्टोबर गुरुवार- पिवळा रंग

19 ऑक्टोबरला पिवळा रंग परिधान करून देवी स्कंदमातेची पूजा करणे खूप शुभ राहील. पिवळा रंग धारण केल्याने पूजन केल्याने सौभाग्य प्राप्त होते.

२० ऑक्टोबर शुक्रवार- हिरवा रंग

20 ऑक्टोबर रोजी माता कात्यायनीची पूजा केली जाईल. या दिवशी भक्तांनी हिरवा रंग परिधान केल्याने प्रगतीचा मार्ग खुला होईल. हिरवा रंग निसर्ग, समृद्धी आणि विकासाचे प्रतीक आहे. यामुळे सुखी वैवाहिक जीवन आणि संतती वाढीचे आशीर्वाद मिळतात.

२१ ऑक्टोबर शनिवार- राखाडी रंग

21 ऑक्टोबर रोजी देवी कालरात्रीच्या पूजेमध्ये राखाडी रंग परिधान करा. नवरात्रीमध्ये राखाडी रंगाची पूजा केल्याने दुष्टांचा नाश होतो.

२२ ऑक्टोबर रविवार- जांभळा रंग

22 ऑक्टोबर रोजी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवी महागौरीची पूजा करा. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख-समृद्धी प्राप्त होते.

२३ ऑक्टोबर सोमवार- मोरपंखी रंग

23 ऑक्टोबर रोजी महानवमीच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाईल. या दिवशी मोरपिसी हिरव्या रंगाचा वापर करा. मोरपिसी हिरवा रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com