Body Types
Body TypesTeam Lokshahi

अवडते कपडे मापात बसत नाही म्हणून त्रस्त आहात ?

तुमचा बॅाडी शेप कोणता आहे हे जाणून घ्यायच असेल तर नक्की वाचा..
Published by  :
Team Lokshahi

बऱ्याचश्या मुली त्यांच्या अवडीची कपडे त्यांना होत नसल्यामुळे किंवा ती मापात बसले तरी अती घट्ट किवा जास्त सैल असल्या कारणाने वैतागलेल्या असतात. याचं कारण असं की त्याना त्यांचा बॅाडी शेप कोणता आहे हे माहित नसतं आणि यामुळेच त्यांना या सगळ्या त्रासातून जावं लागत. हल्ली फॅशन, ट्रेंड प्रमाणे बदलत आहेत. प्रत्येकाला ट्रेंडमध्ये राहायच असतं. त्यामुळे आपण कसे वेगळे दिसू किंवा कश्या प्रकारचे कपडे घातले तर आपण स्टाइलीश दिसू या विचारत सगळेजण असतात. यात वाईट काहीच नाही कारण प्रत्येकाला आपल्याला आवडणारी कपडे घालण्याचा अधिकार असतोच परंतू काही गोष्टींची बेसिक माहिती नसल्या कारणाने आपण कपडे घेण्यात किंवा त्यांना व्यवस्थित कॅरी करण्यात फसतो.

Body Shapes
Body ShapesTeam Lokshahi

प्रत्येक शरीर सुंदर आहे आणि त्याला सुंदर दिसण्याचा, ठेवण्याचा अधिकार आहे. आपल्या सर्वांच्या बॅाडीचे शेप्स वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकाप्रमाणे आपल्यालाही वेगळं आणि अनोखं बनायच असत. चला तर मग जाणून घेऊयात बॅाडी शेप्स बद्दल...

Pear Shape Body Type
Pear Shape Body TypeTeam Lokshahi

आपल्या शरीराचे एकुण 6 वेगवेगळे शेप्स असतात. परंतू त्यात मुख्य 3 शेप्स असतात जसे की ;

पियर शेप बॅाडी टाइप : या बॅाडी शेपमध्ये शरीराचा खालचा भाग हा शरीराच्या वरच्या भागाच्या तुलनेत मोठा किंवा रूंद असतो. त्यामुळे कमरेच्या मापाची जिन्स् किंवा लेगींस पायाना घट्ट बसतात आणि यामुळे आपण आपल्या वजनाच्या दुपट जाड दिसू लागतो असं आपल्याला वाटतं आणि म्हणूनच अशा कपड्यांमध्ये आपण अन्कंफर्टेबल फिल करू लागतो. तुम्ही जर या समस्येतून जात असाल तर तुम्ही पियर शेप बॅाडी टाइपमध्ये मोडले जाता. या सगळ्या समस्यांमुळे आपल्या मापाची कपडे आपल्याला कधी मिळणारच नाही असं वाटू लागतं परंतू काळजी करण्याची काही गरज नाही. कारण प्रत्येक शरीराच्या मापाची कपडे बाजारात उपलब्ध असतात. फक्त आपल्याला ती ठिकाने किंवा कपड्यांची माहिती मिळण्यात उशीर होत असतो. पियर शेप बॅाडी टाइपच्या मुलींवर एक साइज मोठी असलेली कपडे छान दिसतात. खासकरून जींस्, लेगींस् किंवा घट्ट बॅाटम वेयरसच्या बाबतीत अशा कपड्यांमध्ये कंफर्टेबल वाटतं व आपला आतमविश्वास देखील वाढतो.

Inverted Triangle Body Shape
Inverted Triangle Body ShapeTeam Lokshahi

इंवरटेड शेप बॅाडी टाइप : अशा प्रकारच्या बॅाडी टाइपमध्ये शरीराचा वरचा भाग हा शरीराच्या खालच्या भागापेक्षा रूंद असतो हा पियर शेप बॅाडी टाइपच्या एकदम उलट असतो, यामुळे जास्त सैल कपडे घातल्याने खांदे आंखी रूंद दिसू लागतात. परंतू यात कुठलीही काळजी करण्याची काही गरज नाही. कारण हल्ली बाजारात बऱ्याच प्रकारचे कपडे उपलब्ध असतात. अशा प्रकारच्या शरीराच्या मुलींना फार समस्यांमधून जावं लागत नाही. आणि अवडीचे कपडे देखील घालता येतात.

Triangle and Inverted Triangle Body Shape
Triangle and Inverted Triangle Body ShapeTeam Lokshahi
Hourglass Body Type
Hourglass Body TypeTeam Lokshahi

आरग्लास : या प्रकारच्या बॅाडी शेपमध्ये शरीराचा वरचा आणि खालचा भाग दोन्ही एक समान असतात व या बॅाडी शेपमध्ये कंबरेचा आकार अगदी आकर्षक आणि प्रत्येक स्त्रीला हवा हवासा वाटेल असा आसतो. हा बॅाडी शेप इतर सगळ्या बॅाडी शेप्सच्या तुलनेत अधिक सुंदर असतो. बॅाडी शेपच वैशिष्ट्य असं आहे की, या प्राकारच्या बॅाडी टाइपवर सगळ्या प्रकारचे कपडे शोभून दिसतात.

Hourglass Body Type
Hourglass Body TypeTeam Lokshahi
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com