आषाढी एकादशीचा उपवास करताय; 'या' गोष्टींची घ्या काळजी

आषाढी एकादशीचा उपवास करताय; 'या' गोष्टींची घ्या काळजी

आपल्या तब्येतीची काळजी घेऊन उपवासाचा आहार घ्यावा. यामुळे एकादशीचा उपवास करताना या गोष्टींची काळजी घ्या.

महाराष्ट्रमध्ये 'आषाढी एकादशी'ला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूर वारीला जाण्याची परंपरा फार जुनी असून भक्तांची श्रद्धा या वारीशी जुळलेली आहे. दरवर्षी वारकरी पायी पंढपूरला जातात. पण, प्रत्येकालाच जायला जमते असे नाही. म्हणून आपपल्या परिने अनेक जण आषाढी एकादशीचा उपवास करतात. पण, अनेकदा उपवासाच्या दिनी अधिक खाले जाते. परंतु, असे न करता आपल्या तब्येतीची काळजी घेऊन उपवासाचा आहार घ्यावा. यामुळे एकादशीचा उपवास करताना या गोष्टींची काळजी घ्या.

पावसाळ्याच्या दिवसांत आपल्याला गरम प्यावेसे वाटते. अशावेळी सतत चहा-कॉफी पिण्याची इच्छा होते. परंतु, यामुळे अॅसिडीटी होण्याची शक्तता असल्याने चहा-कॉफी टाळवेच. याऐवजी गरम दूध, ताक, दूध, शहाळं पाणी, लिंबू सरबत असे घेतले तर निश्चितच फायदा होईल.

अनेक जण निर्जल म्हणजेच काहीही न खाता पिता उपवास करतात. परंतु, ज्यांना डायबिटीस, हृदयरोग, रक्तदाब अशा प्रकारच्या समस्या अनेक वर्षांपासून आहेत त्यांनी तब्येतीचा विचार करुनच उपवास करावा.

उपवासात विशेषतः साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे असे वातूळ पदार्थ खाण्यात येतात. पण, पावसाळ्याच्या दिवसांत आपली पचनशक्ती क्षीण झालेली असते. अशात गॅसेसचा त्रास होण्याची शक्यता असते. यामुळे वातूळ पदार्थांचे प्रमाण कमी राहील असे पाहावे. व फळांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा.

उपवासाला तळलेले वडे, चिवडा, पापड्या, वेफर्स असे पदार्थही खाल्ले जाते. पावसाळ्यामध्ये आपल्याला खोकला झाला असल्यास तेलकट पदार्थ खाणे टाळावे. त्यापेक्षा खजूर, राजगिऱ्याचे लाडू, सुकामेवा हे खायला हवे. याबरोबरच काकडी यांचाही आहारात समावेश करावा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com