पाय काळे दिसताहेत तर केळीच्या सालांपासून अशाप्रकारे घरीच करा पेडीक्योर; दिसतील चमकदार

पाय काळे दिसताहेत तर केळीच्या सालांपासून अशाप्रकारे घरीच करा पेडीक्योर; दिसतील चमकदार

केळीची साले फेकून देण्याची चूक कधीही करु नका. कारण केळीच्या सालीमध्ये एकच नाही तर अनेक गुणधर्म लपलेले आहेत.

Skin Care : केळीची साले फेकून देण्याची चूक कधीही करु नका. कारण केळीच्या सालीमध्ये एकच नाही तर अनेक गुणधर्म लपलेले आहेत. त्यामध्ये पोटॅशियम, एमिनो अ‍ॅसिड, जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात आणि ते मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यात देखील चांगला प्रभाव दाखवतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे पाय चांगले दिसत नाहीत किंवा टॅनिंग होत आहेत, त्वचेच्या मृत पेशी आणि कोरडी त्वचा पायांवर दिसत आहे, तर केळीच्या सालीने पेडीक्योर करता येते.

पाय काळे दिसताहेत तर केळीच्या सालांपासून अशाप्रकारे घरीच करा पेडीक्योर; दिसतील चमकदार
कपड्याच्या कपाटात ठेवा साबणाची वडी, वास आणि किडे होतील नाहीसे

पाय स्वच्छ करण्यासाठी अशाप्रकारे करा केळीच्या सालीचा वापर

- पहिला मार्ग म्हणजे ही साले जशी आहेत तशी आपल्या पायावर घासणे. तुमच्या पायाची बोटं कोरडी असल्यास किंवा टाचांना तडे गेलेल्या दिसत असल्यास, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी तुम्ही केळीची साले पायांवर घासू शकता.

- केळीची साले बारीक चिरून घेणे. त्यात मध टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट पायावर मास्कप्रमाणे लावा आणि अर्ध्या तासानंतर पाय धुवा. तुमचे पाय चमकतील आणि पूर्वीपेक्षा खूपच मऊ होतील. हा मास्क लावल्यानंतर तुम्ही काही पॉलिथीन वगैरे पायाला बांधून बसू शकता जेणेकरून पायांच्या चिकटपणामुळे बाकीचे कपडे घाण होणार नाहीत.

- तुम्ही केळीची साले कापून त्यात कोरफड जेल मिक्स करून पायांना लावू शकता. तुम्ही कोरफडीचा ताजा गर देखील वापरू शकता. हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे पायांवर लावा आणि नंतर धुवा. पायात ओलावा राहील आणि कोरडेपणा दूर होईल.

- पायांच्या स्वच्छतेसाठी केळीच्या सालीचा स्क्रब देखील वापरता येतो. यासाठी कॉफी पावडरमध्ये मध घालून केळीच्या सालीचे छोटे तुकडे करून मिक्स करा. हा स्क्रब तुमच्या बोटांवर घ्या आणि 10 ते 15 मिनिटे पायांना घासून घ्या आणि नंतर धुवा. पाय स्वच्छ दिसतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com