फ्रीजमध्ये तुम्हीही अन्न ठेवत आहात का? जाणून घ्या 'हे' धोके

फ्रीजमध्ये तुम्हीही अन्न ठेवत आहात का? जाणून घ्या 'हे' धोके

फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्नाचा शरीरावर काय परिणाम होतो याबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेऊया.
Published by :
Shamal Sawant
Published on

रात्री किंवा कधीही अन्न उरलं की ते फ्रीजमध्ये ठेवायची सगळ्यांनाच सवय असते. पण फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती सुरक्षित आहे? याची तुम्हाला कल्पना आहे का? त्याचप्रमाणे फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्नाचा शरीरावर काय परिणाम होतो याबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेऊया.

अन्न खराब होऊ नये यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवतात. उरलेले थंड अन्न पुन्हा गरम करून खाल्ले जाते, यामुळे अन्नाची गुणवत्ता खराब होऊ शकते.ज्यामुळे शरीर अनेक आजारांना बळी पडू शकते. उन्हाळ्यात रेफ्रिजरेटरमध्ये अन्न ठेवणे आरोग्यासाठी कसे धोकादायक ठरू शकते ते जाणून घेऊया.उन्हाळ्याच्या हंगामात, अन्नामध्ये बॅक्टेरिया आणि जंतू वेगाने वाढू शकतात. बॅक्टेरिया अन्न खराब करू शकतात ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.

त्याचप्रमाणे खराब झालेले अन्न खाल्ल्याने उलट्या आणि जुलाब सारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. भात खराब होऊ नये यसाठी तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याची अधिक शक्यता असते. भातामध्ये बॅसिलस सेरियससारखे बॅक्टेरिया वाढू लागतात, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.अन्न शिजवल्यानंतर २ तासांपेक्षा जास्त काळ खोलीच्या तपमानावर असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवू नका.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com