Ganesh Chaturthi 2023:  गणेश चतुर्थीला द्या एकमेकांना 'या' खास शुभेच्छा

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीला द्या एकमेकांना 'या' खास शुभेच्छा

गणपती उत्सव म्हटला की सगळ्यांच्या मनात आणि अंगात एक वेगळाच उत्साह आणि संचार असतो. गणेश चतुर्थी हा सणच असा वेगळा आणि उत्साहाचा आहे.
Published by  :
Sagar Pradhan

गणपती उत्सव म्हटला की सगळ्यांच्या मनात आणि अंगात एक वेगळाच उत्साह आणि संचार असतो. गणेश चतुर्थी हा सणच असा वेगळा आणि उत्साहाचा आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण सगळ्याचा शुभ कामांना सुरूवात करत असतो. गणपतीच्या आगमनासाठी हल्ली वेगवेगळे स्टेटस (ganpati bappa welcome status in marathi) ठेवण्यात येतात. गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठीत (wishes for ganesh chaturthi in marathi) देण्याचा थाटच काही वेगळा आहे. गणेश चतुर्थी शुभेच्छा गणपतीसाठी खास स्टेटस (ganpati bappa status in marathi) ठेवून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा एकमेकांना द्या.

श्रींच्या चरणी कर माझे जुळले बाप्पाच्या दर्शनाने सर्व काही मिळाले

येण्याने तुझ्या झाला हर्षोल्हास अशीच कृपा तुझी राहू दे खास

गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा !!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच

बाप्पाच्या चरणी प्रार्थना…

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!

गणराया तुझ्या येण्याने

लाभले सुख, समृद्धी आणि

आनंद सर्व संकटाचे झाले निवारण

लाभले तुझ्या आशिर्वादाने सर्व काही

गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा !!!

बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात

भरभरून सुखसमृद्धी येवो

हीच गणरायच्या चरणी प्रार्थना

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!

देव येतोय माझा, आस लागली तुझ्या दर्शनाची

एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार!

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com