घाम ज्यास्त येण्याची कारणे व घाम कमी करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
सर्वच लोकांना घाम येतो. घाम आल्यामुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते. पण काही लोकांना अधिक घाम येतो. याला हायपरहाइड्रोसिस डिसऑर्डर (Hyperhidrosis) असे म्हणतात. पण जास्त घाम कशामुळे येतो याची कारणे व त्यावरील उपाय याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
घाम का व कशासाठी येतो..?
आपल्या त्वचेतील घामाच्या ग्रंथीद्वारे घाम तयार होत असतो. घामाच्या ग्रंथी ह्या संपूर्ण शरीरावर असतात. त्यातही त्या प्रामुख्याने कपाळावर, काखेत, हातापायांचे तळव्यांवर जास्त असतात. त्यामुळे तेथे घाम अधिक येत असतो. घामामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. याशिवाय घामात सोडिअम, पोटॅशियम अशी क्षारतत्वेही (salts) असतात. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे घामाचे प्रमुख कार्य असते.
घाम जास्त येण्याची कारणे :
⦁ उन्हाळ्यातील उकाड्यामुळे किंवा कडक उन्हात जास्त फिरल्याने घाम येतो.
⦁ जास्त काम किंवा व्यायाम करण्याने घाम भरपूर येतो.
⦁ उष्ण वातावरणात काम करण्याने,
⦁ जास्त गरम किंवा तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे,
⦁ पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे,
⦁ तसेच काहीवेळा विशिष्ट औषधे, मेनोपॉज, स्थूलता, रक्तातील साखर कमी झाल्याने, ⦁ थायरॉइडची समस्या यामुळेही अतिघाम येण्याची समस्या निर्माण होते.
घाम कमी येण्यासाठी हे करावे घरगुती उपाय :
लिंबू –
हाता-पायाच्या तळव्यांना किंवा काखेत जास्त घाम येत असल्यास अर्धा लिंबू कापून तो जास्त घाम येणाऱ्या भागावर चोळावा व त्यानंतर तीस मिनिटांनी हात पाय धुवावेत किंवा अंघोळ करावी. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते त्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि घाम कमी होण्यासाठी मदत होते.
बेकिंग सोडा –
एक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात लिंबू रस घालावा. त्यानंतर घाम येणाऱ्या ठिकाणी कापसाच्या बोळ्याने ते मिश्रण लावावे. त्यानंतर तीस मिनिटांनी आंघोळ करावी.
टोमॅटो –
अधिक घाम येत असल्यास टोमॅटोचा आहारात समावेश करावा, ग्लासभर टोमॅटोचा ज्यूस दररोज प्यावा. टोमॅटोमुळे घाम कमी करण्यासाठी मदत होते.